Tata Group च्या 'या' 2 स्‍टॉक्‍समधून कराल तगडी कमाई

टाटा ग्रुपच्या या 2 स्‍टॉक्‍समध्ये मिळेल 25% रिटर्न...
tata group
tata groupsakal
Updated on

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी यूएस फेडने सलग तिसऱ्यांदा व्याजदर वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कमालीची अस्थिरता आहे. बाजारातील या अस्थिरतेच्या काळात आणि सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी काही दर्जेदार स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायची आता चांगली संधी आहे.

या सगळ्यात भरवश्याची कंपनी टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टाटा ग्रुपचा ऑटो स्टॉक टाटा मोटर्स आणि टायटन कंपनीबाबत ब्रोकरेज हाऊसने आपले रेटींग दिले आहे. या दोन्ही शेअर्सच्या सध्याच्या किंमतीनुसार आता गुंतवणूक केल्यास 25 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

tata group
TATA ग्रुपच्या 'या' शेअरने 3 महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट...

टाटा मोटर्स (Tata Motors)

इक्विटी रिसर्च फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने (Edelweiss Securities) अलीकडेच टाटा मोटर्सच्या मॅनेजमेंटशी चर्चा केली. मॅनेजमेंटचा आउटलूक चांगला असल्याचे समोर आले. FY24 नेट ऑटो डेट आणि JLR EBIT मार्जिन / FCFगायडंसबाबत एक मजबूत योजना असल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.

येत्या काळात सप्लाय चेनमध्ये सुधारणा आहे, JLR साठी सप्लाय चांगला आहे. India MHCV साठी कंपनीचा आऊटलूक चांगला आहे. पॅसेंजर व्हेहीकलमध्ये ईव्हीची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम या स्टॉकवर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेट्रोल-डिझेल वाहनांसाठी सिंगल डिजिट मार्जिन आणि व्हॉल्यूम वाढ यावर कंपनीने फोकस केले आहे.

tata group
Tata motors : 'पॉवर ऑफ 6' चे मुंबईत आयोजन

त्यामुळेच एडलवाईसने स्टॉकवरील बाय रेटींग कायम ठेवले आहे. तसेच, टारगेट 514 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, जागतिक ब्रोकरेज हाऊस HSBC ने टाटा मोटर्सवर प्रति शेअर 540 रुपयांचे टारगेट ठेवून खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. 22 सप्टेंबरला टाटा मोटर्सची किंमत 432 रुपयांवर होती. अशा प्रकारे, सध्याच्या किमतीपासून स्टॉकमध्ये 25 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळू शकतो. गेल्या एका वर्षात आतापर्यंत स्टॉकमध्ये जवळपास 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

tata group
Tata-Airbus Project : वेदांता गुजरातला जाताच राज्य सरकारला खडबडून जाग; हालचालींना वेग

टायटन कंपनी (Titan Company)

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने टायटन कंपनी लिमिटेडच्या स्टॉकवर ओव्हरवेटचे रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच, टारगेट 2800 रुपयांवरून 2902 रुपये प्रति शेअर करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर 2023 च्या शेअरची किंमत 2738 वर होती. अशाप्रकारे, स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. गेल्या एका वर्षात आतापर्यंत स्टॉकमध्ये जवळपास 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com