केपजेमिनीचे 'थिएरी डेलापोर्टे' विप्रोच्या सीईओ आणि एमडीपदावर

वृत्तसंस्था
Friday, 29 May 2020

अबिदाली नीमुचवाला १ जूनपासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय पदावरून बाजूला होणार आहेत.थिएरी डेलापोर्टे विप्रोमध्ये रुजू होईपर्यत रिशाद प्रेमजी कंपनीचे सर्व कामकाज सांभाळणार आहेत.

विप्रो लि. या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर थिएरी डेलापोर्टे यांची नियुक्ती केली आहे. डेलापोर्टे यांची नियुक्ती ६ जुलै २०२० पासून लागू होणार आहे. अबिदाली नीमुचवाला १ जूनपासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय पदावरून बाजूला होणार आहेत. थिएरी डेलापोर्टे विप्रोमध्ये रुजू होईपर्यत रिशाद प्रेमजी कंपनीचे सर्व कामकाज सांभाळणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थिएरी डेलापोर्टे हे केपजेमिनी समूहाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. ते समूहाच्या कार्यकारी संचालक मंडळाचे सदस्यदेखील होते. डेलापोर्टे यांची केपजेमिनीसोबतची कारकिर्द २५ वर्षांची आहे. यात त्यांनी विविध वरिष्ठ पदांची जबाबदारी सांभाळली आहे. यामध्ये समूहाच्या ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिेसेस स्ट्रॅटिजिक बिझनेस युनिटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी, तसेच सर्व ग्लोबल सर्व्हिस लाईनचे प्रमुख याचा समावेश आहे. त्यांच्यावर केपजेमिनीच्या भारतातील कामकाजाची जबाबदारी होती.  

स्पेक्ट्रम लिलावामुळे दूरसंचार क्षेत्रावरील कर्ज वाढण्याची शक्यता

'थिएरी यांचा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्तीचा मला आनंद होतो आहे. नेतृत्व कौशल्य, उत्तम आंतरराष्ट्रीय व्यवसाय, धोरणात्मक कौशल्य, ग्राहकांबरोबर उत्तम दीर्घकालीन संबंध प्रस्तापित करणे, मोठे बदल करणे, तंत्रज्ञानाशी निगडीत समस्या सोडवणे हे सर्व गुण  थिएरी यांच्याकडे आहेत. विप्रोच्या पुढील वाटचालीमध्ये कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी थिएरी हे योग्य व्यक्ती आहेत', असे मत विप्रो लि.चे चेअरमन रिशाद प्रेमजी यांनी व्यक्त केले आहे.

एअर इंडिया कर्मचारी संघटनांनी मागितले ५०,००० कोटींचे आर्थिक पॅकेज

'विप्रोचे नेतृत्व करायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाचीच बाब आहे. विप्रो ही उत्तम मूल्यांच्या आधारावर आणि उत्तम  तंत्रज्ञानाच्या पंरपरेच्या आधारावर बांधणी असलेली कंपनी आहे. रिशाद, संचालक मंडळ, वरिष्ठ नेतृत्व आणि विप्रोचे कुशल मनुष्यबळ यांच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. या सर्वांच्या सहकार्याने विप्रोसाठी प्रगतीचा नवा टप्पा गाठण्यास आणि कंपनीच्या सर्व हितसंबंधियांसाठी उत्तम भविष्याच्या निर्मितीसाठी काम करण्यास मी उत्सुक आहे', असे मत थिएरी डोलापोर्टे यांनी व्यक्त केले आहे.

श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...

डेलापोर्टे हे पॅरिस येथील कार्यालयातून कामकाज सांभाळणार आहेत. ते कंपनीचे चेअरमन रिशाद प्रेमजी यांना रिपोर्टिंग करणार आहेत. थिएरी अर्थशास्त्राचे आणि वित्त विषयाचे पदवीधर आहेत. त्यांनी कायद्यात पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thierry Delaporte is Wipro's new CEO