Stock: एक रुपयापेक्षा कमी किंमतीच्या 'या' शेअरने गुंतवणूकार कोट्याधीश...

ही कंपनी आयटी, डिजिटल मीडिया आणि आयटी-अनेबल्ड सेवा देते. कंपनीचे मार्केट कॅप 1.39 हजार कोटी रुपये आहे.
Share Market Update
Share Market Updateesakal

कोरोना काळात जगभरातील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. त्याचवेळी भारतीय शेअर बाजार रोज रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवत होता. या तेजीच्या काळात, अनेक पेनी स्टॉक्सने अवघ्या 3 वर्षांत त्यांच्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले. क्रेसांडा सॉल्यूशन्स लिमिटेड (Cressanda Solutions Ltd) ही अशीच एक कंपनी आहे, जिने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न दिला आहे. क्रेसांडा सोल्युशन्स ही आयटी सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनी असून तिचे मुंबईत मुख्यालय आहे. ही कंपनी आयटी, डिजिटल मीडिया आणि आयटी-अनेबल्ड सेवा देते. कंपनीचे मार्केट कॅप 1.39 हजार कोटी रुपये आहे.

Share Market Update
Latest Marathi News | मुंबईकडे जाणाऱ्या, येणाऱ्या काही रेल्वे 'या' दिवशी रद्द

शुक्रवारी बीएसईवर क्रेसांडा सोल्यूशन्सचे शेअर्स 34.95 रुपयांवर बंद झाले. पण 3 वर्षांपूर्वी 27 सप्टेंबर 2019 रोजी बीएसईवर त्याच्या शेअर्सची किंमत फक्त 0.21 रुपये होती. म्हणजे एका रुपयापेक्षाही कमी, अशा या शेअरमध्ये फक्त गेल्या 3 वर्षात 16,542.89 टक्क्यांनी प्रचंड वाढ केली आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 1.66 कोटी रुपये झाले असते

Share Market Update
Stock: या हॉटेल स्टॉकचा 6 महिन्यात 141% रिटर्न

1 वर्षात 18 पट वाढ
क्रेसांडा सोल्युशन्सचे शेअर्स एका वर्षापूर्वी बीएसईवर 1.89 रुपयांवर होते, जे आता वाढून 34.95 रुपये झालत. अशाप्रकारे, गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 18 पट (सुमारे 1750 टक्के) पेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, 2022 च्या सुरुवातीपासून या शेअरची किंमत सुमारे 414.73 टक्क्यांनी वाढली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी क्रेसांडा सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 18 लाख झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते, तर आज त्याचे  5.14 लाख रुपये झाले असते.

Share Market Update
Sugar Stock: फक्त 55 रुपयांचा 'हा' स्टॉक वाढवेल तुमच्या पोर्टफोलिओची गोडी

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com