ही हॉस्पिटल चेन देईल 93% नफा, तज्ज्ञांकडून शेअर खरेदीचा सल्ला...

हॉस्पिटल सेक्टरमधील दिग्गज शॅल्बी (Shalby) या हॉस्पिटल चेनचे शेअर्स यावर्षी सुमारे 12 टक्क्यांनी घसरले आहेत
 share market
share market google

नॉन कोविड बेड असलेल्या हॉस्पिटल्ससाठी मागचा काळ यथातथा होता, पण आता परिस्थिती सुधारते आहे. हॉस्पिटल सेक्टरमधील दिग्गज शॅल्बी (Shalby) या हॉस्पिटल चेनचे शेअर्स यावर्षी सुमारे 12 टक्क्यांनी घसरले आहेत आणि त्यामुळेच यात खरेदीची चांगली संधी चालून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  सध्याच्या किमतीत गुंतवणूक केल्यास 93 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. बुधवारी हा शेअर 126.20 रुपयांवर घसरून बंद झाला आहे.

 share market
Share Market : या 2 स्टॉक्समध्ये मिळेल बंपर रिटर्न, तज्ज्ञांचा सल्ला

मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चेन शॅल्बीने 10 हॉस्पिटल्सची (1295 बेड ते 1962 बेड्स) विस्तार योजना 2017 पर्यंत पूर्ण केली पण कोरोनामुळे, सर्व बेड भरले जात नव्हते आणि रिटर्न रेशो कमी होता. पण, त्याचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू  2017-22 या आर्थिक वर्षात त्यांचा CAGR 16.6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला.

 share market
Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर

18.4 टक्के सीएजीआरने आर्थिक वर्ष 2025 पर्यंत त्याची ऑपरेटिंग महसूल 1159.4 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते असे व्हेंचुराच्या तज्ज्ञांच्या म्हणणे आहे. त्यांचे नेट प्रॉफिट 41.5 टक्के CAGR वर 151.6 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. या सर्व कारणांमुळे, व्हेंचुराने शॅल्बीवर बाय रेटिंग दिले आहे आणि टारगेट 243 रुपये दिले आहे. गेल्या वर्षी, 29 सप्टेंबर 2021 रोजी, शॅल्बीचे शेअर्स 181.65 रुपयांवर होते, म्हणजेच त्याची सध्याची 126.20 रुपयांची किंमत 30 टक्के डिस्काउंटवर मिळत आहे.

 share market
Navratri 2022: लोणारच्या कमळजा देवी मंदिराचा काय आहे इतिहास?

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते उच्चांकावर पोहोचले पण ते टिकू शकले नाही आणि यावर्षी ते 23 जून 2022 पर्यंत 95.10 रुपयांपर्यंत खाली आले, जो एका वर्षातील नीचांक आहे. मात्र, त्यानंतर हा शेअर सावरला असून आतापर्यंत सुमारे 33 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. त्यामुळेच त्यात 93 टक्के वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com