Share Market : या 2 स्टॉक्समध्ये मिळेल बंपर रिटर्न, तज्ज्ञांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : या 2 स्टॉक्समध्ये मिळेल बंपर रिटर्न, तज्ज्ञांचा सल्ला

Share Market : शेअर बाजाराच्या अस्थिर वातावरणात टिकून राहायचे असेल तर चांगले दमदार शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणे गरजेचे आहे. शेअर बाजारात चांगल्या स्टॉक्समध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत दमदार नफा कमावता येतो. पण त्यासाठी चांगल्या फंडामेंटल्स असणाऱ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरु आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार पडझड सुरूच, सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला

अशात शेअर मार्केट तज्ज्ञांनी तुमच्यासाठी 2 दमदार स्टॉक्सची निवड केली आहे, ज्यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

हेही वाचा: Share Market: फक्त 11 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1 कोटी

युनायटेड स्पिरिट्स (UNITED SPIRITS)

युनायटेड स्पिरिट्सच्या (UNITED SPIRITS) शेअर्ससाठी तज्ज्ञांनी बीटीएसटी (BTST) धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला आहे, म्हणजे या स्टॉकमध्ये आजच खरेदी करा आणि उद्या विक्री करा. या स्टॉकमध्ये 885-900 रुपयांचे टारगेट दिसू शकते असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यूके-भारत यांच्यात मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) होणार आहे. त्यामुळे अल्कोलिक उत्पादने (Alcoholic Products) बनवणाऱ्या या कंपनीलाही फायदा होऊ शकतो.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सुरूच, सकाळच्या तेजीनंतर पुन्हा घसरण

इंडसइंड बँक (INDUSIND BANK)

दुसऱ्या स्टॉकसाठी त्यांनी इंडसइंड बँकेची (INDUSIND BANK) निवड केली आहे. हा स्टॉक मंगळवारी देशांतर्गत फंडांनी खरेदी केला आहे. या स्टॉकमध्ये 1200-1225 रुपयांचे टारगेट सहज दिसते, त्यामुळे या शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा: Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या

टॅग्स :Share MarketStock Market