
एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकचा दमदार परतावा, एका लाखाचे 8 लाख....
शेअर बाजारात प्रत्येकालाच भरपूर पैसे कमवायचे असतात, त्यामुळे चांगला परतावा देणारे शेअर्स हेरुन त्यात पैसे गुंतवणे खुप गरजेचे आहे. अनेकदा आपण मल्टीबॅगर शेअर्सबाबत ऐकत असतो. हेच मल्टीबॅगर होऊ पाहणारे शेअर्स तुम्ही आधीच हेरुन ठेवले तर तुम्हालाही भरघोस नफा मिळू शकतो यात शंका नाही.
अशावेळी शेअर बाजाराचा अभ्यास महत्त्वाचा आहे, पण तेवढाही वेळ नसेल तर दिग्गजांचे पोर्टफोलिओ, तज्ज्ञ किंवा ब्रोकरेज हाऊस काय सांगत आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगला परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे सोपे जाईल.
हेही वाचा: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उतार
आज आम्ही अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत आणि हा शेअर आहे जीकेपी प्रिटींग अँड पॅकेजिंग लिमिटेड (G K P Printing & Packaging Ltd) हा बीएसईवर लिस्ट केलेला स्टॉक आहे.
या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या एका वर्षात 635% परतावा दिला आहे. म्हणजेच,हा शेअर 25 रुपयांवरून 184 रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक वर्षभरात 7.35 लाख रुपये झाली.
हेही वाचा: जवळपास महिनाभर मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
या शेअरचा हा तीन वर्षांतील सर्वात मोठा परतावा आहे. या तीन वर्षांत जीकेपी प्रिटींग अँड पॅकेजिंग लिमिटेडच्या (G K P Printing & Packaging Ltd) शेअर्सनी 850% परतावा दिला. 10 मे 2019 रोजी कंपनीचे शेअर्स 19.27 रुपयांवर होते. जे आता 185.05 रुपयांवर गेलेत. जर तुम्ही 2019 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्याकडे 9.50 लाख रुपये असतील.
कंपनीचा व्यवसाय?
जी के पी प्रिंटिंग कार्डबोर्ड बॉक्स बनवते. देशात प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी असल्याने पुठ्ठ्याचे खोके किंवा बॉक्स बनवणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी, जीकेपी प्रिंटिंगचे शेअर्स 1.20% म्हणजेच 2.20 रुपयांच्या वाढीसह 185.05 रुपयांवर बंद झाले होते.
हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: शेलारांसोबत बैठकीनंतर फडणवीस दिल्लीला रवाना
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: This Multibagger Stock Will Give Super Return Check Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..