Stock: खाद्यतेलाच्या या शेअरने 3 महिन्यांत एक लाखाचे केले 15 लाख...

विशेष म्हणजे सलग 58 व्या दिवशी या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागले.
oil
oilsakal

अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजचे (Ambar Protein industry) शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह तेजीत दिसले आणि स्टॉक 730 रुपयांच्या पातळीवर राहिला, जो त्याचा विक्रमी उच्चांक आहे. त्याच वेळी, त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 13.12 रुपये आहे. विशेष म्हणजे सलग 58 व्या दिवशी या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागले. (Stock Market)

oil
Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?

तीन महिन्यांत 1,500 टक्क्यांहून अधिक परतावा

गेल्या तीन महिन्यांत, या एडिबल ऑईल कंपनीच्या (edible oil company) स्टॉकने 45 रुपयांवरून 1,500 टक्के मजबूत परतावा दिला आहे. तुलनेत, एसअँडपी बीएसई सेन्सेक्स या कालावधीत 12 टक्क्यांनी वाढला आहे.

अंबर प्रोटीनची स्थापना 31 डिसेंबर 1992 ला एडिबल/ नॉन एडिबल ऑईल, ऑईल केक आणि डी ऑइल केक तयार करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. सध्या कंपनी खरेदी आणि पॅकिंगच्या विभागांमध्ये कापूस बियाणे तेलाची रिफायनिंग आणि ट्रेडिंग, रिसेलसाठी रिफाईंड कॉटनसीड ग्राउंडनट ऑईल, रिफाइंड सनफ्लॉवर, रिफाइंड मेज ऑईल आणि सोयाबीन ऑईलच्या खरेदी आणि पॅकींगच्या व्यवसायात आहे. हा शेअर सध्या एक्सटी ग्रुप अंतर्गत व्यवहार केला जात आहे. या समूहातील सर्व  शेअर्स फक्त बीएसईवर लिस्ट आहेत. या कंपन्यांचे मार्केट कॅप कमी ते मध्यम आहे.

oil
Stock Market : हे 4 ऑटो स्‍टॉक्‍स येत्या काळात करतील दमदार परफॉर्म

30 जून 2022 पर्यंत एकूण 57.5 लाख आउटस्टँडिंग शेअर्ससह अंबर प्रोटीनचा इक्विटी बेस खूपच कमी आहे. प्रमोटर्सकडे कंपनीतील 74.97 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित भाग इतर वैयक्तिक शेयरहोल्डर्सकडे (24.42 टक्के) आणि इतर (0.61 टक्के) आहेत.

वाढती लोकसंख्या, वाढत्या दरडोई वापरामुळे भारतातील खाद्यतेलाच्या मागणीचा आऊटलूक सकारात्मक असल्याचे अंबर प्रोटीनने आपल्या FY22 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. जीवनशैलीतील बदल, वाढते शहरीकरण, मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढ यामुळेही सपोर्ट मिळत आहे.

oil
Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदार

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com