या शिपिंग स्टॉकने एका वर्षात केले 1 लाखाचे 15 लाख... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

या शिपिंग स्टॉकने एका वर्षात केले 1 लाखाचे 15 लाख...

नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्सच्या शेअर्सने  (Knowledge Marine & Engineering Works) गुरूवारी बीएसईवर (BSE) 659.15 रुपयांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला. शेवटी, शेअर सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह 658.50 रुपयांवर बंद झाला. या वर्षी नॉलेज मरीनचे शेअर्स आतापर्यंत 337.69% वाढले आहेत. यासह, 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा देणार्‍या काही शेअर्सपैकी हा एक बनला आहे.

हेही वाचा: Share Market : सणासुदीच्या काळात हा गारमेंट स्टॉक देईल तगडा परतावा...

नॉलेज मरीनचे शेअर्स मार्च 2021 मध्ये बीएसईवर लिस्ट झाले होते. कंपनीने आयपीओमध्ये आपल्या शेअर्सची इश्यू प्राईस 37 रुपये निश्चित केली होती. नॉलेज मरीनचे शेअर्स बीएसईवर 36.85 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाले होते, ज्याची किंमत आता 658.50 रुपये झाली आहे. म्हणजेच, गेल्या काही महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,686.97 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स 509 घसरला

त्याच वेळी, नॉलेज मरीनच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात सुमारे 1,422.54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 च्या सुरुवातीपासून, त्याने आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 337.69 टक्क्यांनी वाढ केली आहे, तर गेल्या एका वर्षात त्याचे शेअर्स सुमारे 12 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स 509 घसरला

एखाद्या गुंतवणूकदाराने 26 मार्च 2021 रोजी नॉलेज मरीनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 18 लाख रुपये झाली असती. दुसरीकडे, एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 15 लाखांपेक्षा जास्त झाले असते. नॉलेज मरीनचे मार्केट व्हॅल्यू  674.04C कोटी रुपये झाले आहे. नॉलेज मरीनचे शेअर्स सध्या बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर 'एम' ग्रुप अंतर्गत व्यवहार करतात

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, सेन्सेक्स 188 अंकांनी घसरला

नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स  (Knowledge Marine & Engineering Works) ही कंपनी देशातील विविध बंदरांवर ड्रेजिंगसह  मरीन इंजीनिअरिंग सॉल्यूशंस देते. हे नौदल आणि इतर व्यावसायिक जहाजांची दुरुस्ती करते आणि जहाजांच्या मेंटेनेन्स आणि ऑपरेशनसंबंधित टेक्निकल सेवाही देते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.