esakal | देशातील Top-10 हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर खिशाला परवडणारे
sakal

बोलून बातमी शोधा

finanace home loan

भारतातील हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे रिझर्व्ह बँकेअंतर्गत नियमन केले जाते.

देशातील Top-10 हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर खिशाला परवडणारे

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: बरेचजण गृहकर्ज घेण्यासाठी बँकेकडे येत असतात. पण हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज घेणाऱ्यांचीही कमी नाही. हाऊसिंग फायनान्स कंपन्यांही आकर्षक व्याजदरात कर्जे देतात, ज्यामुळे बरेच जण इथूनच कर्ज घेत असतात.

भारतातील हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे रिझर्व्ह बँकेअंतर्गत नियमन केले जाते. सध्या भारतात 100 हून अधिक हाऊसिंग फायनान्स कंपन्या आहेत. या लेखात आज आपण भारतातील टॉप-10 हाऊसिंग फायनान्स कंपन्या कोणत्या दराने गृहकर्ज देत आहेत ते जाणून घेणार आहोत. ही माहिती एनबीटीने केलेल्या बातमीच्या आधारे आहे.

1. सर्वोत्तम दराने गृहकर्ज देणाऱ्या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये  एचडीएफसी पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या एचडीएफसी फायनान्स कंपनी 6.9 टक्के ते 8.2 टक्के दराने गृहकर्ज देत आहे.

2. या यादीत एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे कंपनी आहे, जी 6.9 टक्के दराने 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.

LPG सिलेंडरची सबसिडी जमा झाली ? माहिती करून घ्या

3- बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीही चांगल्या व्याजदरात गृहकर्जे देते. सध्या ही कंपनी 6.90 टक्के दराने गृहकर्ज देत आहे.

4. अनेक लोक पीएनबी हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतात. इथं गृहकर्जाचे दर 7.50 टक्के आहे. या कंपनीच्या प्रक्रियेत कर्जाच्या 1 टक्का किंवा किमान 10 हजार रुपये प्रोसेसिंग फी आहे.

5. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स 7.50 टक्के दराने कर्ज देत आहे. यामध्ये प्रोसेसिंग फी आणि जीएसटी ०.५ टक्के दराने आहे.

6. कॅनरा बँकेचे गृहकर्जाचे दर 7.75  ते 9.75 टक्क्यांपर्यंत गृहकर्ज दिले जाते.

10 महिन्यांत 100 अब्ज डॉलरची कमाई; सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर

7- दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन किंवा डीएचएफएल 8.75 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. त्यासाठी 0.5 ते 1 टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फी भरावी लागते.

8. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स कंपनी 8.99 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. गृहकर्ज घेताना 2 टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फी द्यावी लागते.

9. आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या वतीने 9 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. प्रोसेसिंग फी ही 1% दराने द्यावी लागणार आहे.

10. सध्या जीआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनी 9.1 ते 12.5 टक्क्यांपर्यंत गृहकर्ज देत आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image