
ग्राहक सबसिडीची रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकतात
नवी दिल्ली: सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला 14.2 किलोच्या 12 सिलिंडरवर सबसिडी देते. जर ग्राहकाला त्यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने विकत घेता येतात. बऱ्याच ग्राहकांना त्यांच्या खात्यात सबसिडीचे किती पैसे जमा होतात याची माहिती नसते.
तसेच सबसिडीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचीही अनेक ग्राहकांची तक्रार आहे. आता ग्राहक सबसिडीची रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकतात.
अशा प्रकारे एलपीजी सबसिडीची स्थिती कळू शकते:
1. मोबाइलवरून गॅस सिलेंडरच्या सबसिडीबद्दल जाणून घेण्यासाठी आधी Mylpg.in जावे लागेल. या वेबसाइटवर तुम्हाला तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांचे (एचपी, भारत आणि इंडेन) टॅब दिसतील. इथं गेल्यानंतर तुम्ही तुमचं ज्या कंपनीचं असेल त्यावर क्लिक करा.
जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये एकट्या अमेरिकेचे 8 जण; पाहा यादी
2. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल, त्यात मेन्यूमध्ये गेल्यानंतर तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी टाका. जर ग्राहकांना त्यांचा एलपीजी आयडी माहीत नसेल तर 'Click here to know your LPG ID' येथे क्लिक करा.
3. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, LPG कन्झ्युमर आयडी, राज्याचे नाव आणि वितरकाची माहिती टाकली पाहिजे. त्यानंतर कॅप्चा कोड भरल्यानंतर प्रोसेस बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यावर तुम्हाला एलपीजी आयडी दिसेल.
4. आता तुमच्या खात्याचा तपशील एका पॉप-अपवर दिसेल. इथं तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड एलपीजी खात्याशी लिंक केले आहे की नाही या माहितीसह तुम्ही सबसिडीचा पर्याय सोडला आहे की नाही हे देखील समजेल.
10 महिन्यांत 100 अब्ज डॉलरची कमाई; सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर
5. या पेजच्या डाव्या बाजूला 'सिलेंडर बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी ट्रान्सफर देखे' यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर ग्राहकांना सबसिडीची रक्कम दिसेल.
(edited by- pramod sarawale)