10 महिन्यांत 100 अब्ज डॉलरची कमाई; सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 24 November 2020

माइक्रोसॉफ्टचे बिल गेट्स या यादीत मागील काही दिवसांत दुसऱ्यांदा क्रमवारी घसरली आहे

वॉशिंग्टन: काही दिवसांपुर्वीच फेसबूकच्या मार्क झुकेरबर्ग यांना मागे टाकत SpaceXचे एलन मस्क जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले होते. आता एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली असून त्यांनी बिल गेट्स यांनाही मागं टाकलं आहे. Tesla आणि SpaceXचे सीईओ एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

1 वर्षात 100.3 अब्ज डॉलरची कमाई-
49 वर्षीय एलन मस्क यांची एकूण संपत्ती 127.9 अब्ज डॉलर झाली आहे. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या दराने वाढल्याने मस्क यांच्या संपत्तीत भरपूर वाढ झाली आहे. मस्क यांनी या वर्षात तब्बल 100.3 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात मस्क हे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत 35 व्या क्रमांकावर होते. एका वर्षात त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची मोठी वाढ झाली असून ते आता जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रंमांकावर आहेत.

जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये एकट्या अमेरिकेचे 8 जण; पाहा यादी

टेस्लाचे सध्याचे बाजारमूल्य 500 अब्ज डॉलर आहे. त्यांच्या एकूण संपत्तीपैकी जवळजवळ तीन चतुर्थांश संपत्ती टेस्लाच्या शेअर्सपासून कमावलेली आहे, ज्यांचा स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्प किंवा स्पेसएक्समधील त्यांच्या हिस्सेदारीपेक्षा चारपट अधिक हिस्सा आहे. 

बिल गेट्स या यादीत मागील काही दिवसांत दुसऱ्यांदा क्रमवारी घसरली आहे. बिल गेट्स अनेक वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर होते, पण 2017 मध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बिजोस पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर गेले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

bloomberg billionaires index top 10- ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या यादीनुसार जगभरातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे प्रथम क्रमांकवर आहेत. तर भारतातील रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी 75.5 अब्ज डॉलरसह दहाव्या क्रमांकावर आहेत. तसेच या यादीत टेस्ला व स्पेस एक्सचे एलन मस्क माइक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, फेसबुकचे मार्क जुकरबर्ग यांचा समावेश आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elon musk became world second richest person tesla and SpaceX ceo