चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात 27 हजार कोटींची घट

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

घसरणीचा आठवडा
या आठवड्यात सेन्सेक्‍समध्ये 227 अंश म्हणजेच 0.76 टक्के तर निफ्टीमध्ये 52 अंश म्हणजेच 0.56 टक्के घसरण झाली आहे. दोन आठवडे वाढ झाल्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली आहे.

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या भांडवलात 26,738.39 कोटींची घट झाली आहे. यामध्ये टीसीएसला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचयूएल यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर एचडीएफसी बँक, आयटीसी, ओएनजीसी, एचडीएफसी, एसबीआय आणि कोल इंडियाच्या बाजारभांडवलात वाढ झाली आहे. या सर्व कंपन्यांनी बाजारात 12,319.95 कोटींची भर घातली आहे. मात्र चार कंपन्यांनी याहून अधिक भांडवल गमावले आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समधील वाढ शुक्रवारी कायम राहिली. सेन्सेक्‍स 89 अंशांनी वधारून 29 हजार 421 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंशांनी वधारून 9 हजार 108 अंशांवर बंद झाला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी थकित कर्जाच्या प्रश्‍नावर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्याने बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात वाढ नोंदविण्यात आली. एसबीआयच्या समभागात 2.81 टक्के तर बॅंक ऑफ इंडिया 5.02, बॅंक ऑफ बडोदा 4.26, युनियन बॅंक ऑफ इंडिया 3.29 आणि पीएनबीमध्ये 4.05 टक्के वाढ झाली. आयसीआयसीआय आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या समभागातही वाढ नोंदविण्यात आली. भारती एअरटेलच्या समभागात मागील दोन सत्रांत घसरण झाली होती.

घसरणीचा आठवडा
या आठवड्यात सेन्सेक्‍समध्ये 227 अंश म्हणजेच 0.76 टक्के तर निफ्टीमध्ये 52 अंश म्हणजेच 0.56 टक्के घसरण झाली आहे. दोन आठवडे वाढ झाल्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली आहे.

(आर्थिक विषयातील अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा www.sakalmoney.com)

Web Title: Top four companies lose Rs 26,738 cr in m-cap