नोटाबंदीतील शेवटचे 10 दिवस रडारवर

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

पॅन क्रमांकाविना झालेल्या 50 हजार रुपयांपेक्षा मोठ्या व्यवहारांची तपासणी

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर झालेल्या संशयास्पद व्यवहारांची तपासणी प्राप्तिकर विभागाकडून सुरू आहे. नोटाबंदीच्या शेवटच्या दहा दिवसांत झालेली नव्या खात्यांतील जमा, कर्ज परतफेड, आयातीचे आगाऊ शुल्क यासह ई-वॉलेटवरील व्यवहारांची तपासणी आता सुरू झाली आहे.

नोटाबंदीच्या 50 दिवसांच्या काळात बॅंक आणि टपाल कार्यालयांमध्ये जमा झालेल्या पाचशे व हजारच्या रद्द नोटांच्या व्यवहारांची तपासणी प्राप्तिकर विभागाकडून पूर्ण झाली आहे. आता नोटाबंदीच्या काळातील मुदत ठेवी, कर्ज परतफेड याची तपासणी करण्यात येत आहे. पॅन क्रमांकाविना 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रद्द नोटा जमा करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. नोटाबंदीच्या शेवटच्या दहा दिवसांत रद्द नोटा जमा करणाऱ्यांकडे प्राप्तिकर विभागाने लक्ष वळविले आहे. या काळातील ई-वॉलेटमधील व्यवहार, आयातीचा आगाऊ शुल्क भरणा याचीही तपासणी सुरू आहे. याचबरोबर आरटीजीएस आणि अन्य मार्गाने झालेले इलेक्‍ट्रॉनिक व्यवहार यंत्रणा तपासत आहे.

नोटाबंदीनंतर सुमारे 60 लाख बॅंक खात्यांत 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रद्द नोटा जमा झाल्या आहेत. या खात्यांत एकूण 7.34 लाख कोटी रुपये जमा आहेत. ईशान्येतील राज्यांमधील बॅंक खात्यांमध्ये 10 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक रद्द नोटा जमा झाल्या आहेत. तसेच, सहकारी बॅंकांमध्ये 16 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आणि प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमध्ये 13 हजार कोटींपेक्षा अधिक रद्द नोटा जमा झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: transactions over 50000 to be checked