एसबीआयला फसवले २६ हजार कोटींना

वृत्तसंस्था
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

भारतीय स्टेट बॅंकेची (एसबीआय) कॉर्पोरेट्‌सकडून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या सातच महिन्यांत ते २६ हजार ७५७ कोटी रुपयांवर पोचले आहे.

मुंबई - मोठी कर्जे घेऊन ती परत न देण्याचे प्रमाण सध्या मोठ्या कंपन्यांकडून (कॉर्पोरेट्‌स) होण्यामध्ये वाढ झाली आहे. भारतीय स्टेट बॅंकेची (एसबीआय) कॉर्पोरेट्‌सकडून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या सातच महिन्यांत ते २६ हजार ७५७ कोटी रुपयांवर पोचले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये  कॉर्पोरेट्‌सकडून १० हजार ७२५ कोटींची फसवणूक झाली होती.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

विविध कंपन्यांकडून झालेली थकीत कर्जे (एनपीए), बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेली कर्जे त्याचबरोबर लेखापरीक्षणातील त्रुटींमुळे झालेल्या गैरव्यवहारांचा यात समावेश आहे. 

आरबीआयने ‘एनपीए’ आणि इतर आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात बदलेल्या नियमांमुळे ‘एनपीए’ची प्रकरणे समोर येत आहेत. २०१७-१८ आर्थिक वर्षात एसबीआयने फक्त १४६ कोटींची फसवणूक झाल्याचे दाखविले होते. 

‘एसबीआय’ पाठोपाठ पंजाब नॅशनल बॅंकेची सर्वाधिक १० हजार ८२१ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty six thousand crore SBI deceived