अल्ट्रा टेक सिमेंटचा नफा ५,८१५ कोटींवर, १३ रुपयांचा लाभांश जाहीर

Ultratech-Cement
Ultratech-Cement

अल्ट्रा टेक सिमेंट या देशातील आघाडीच्या सिमेंट उत्पादक कंपनीच्या नफ्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात दुपटीने वाढ होत कंपनीचा एकूण नफा ५,८१५ कोटी रुपयांवर पोचला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात अल्ट्रा टेक सिमेंटला २,४०४ कोटी रुपयांचा एकूण नफा झाला होता. २०१९-२० या आर्थिक वर्षात कंपनीने ४१,४७६ कोटी रुपयांची एकूण विक्री नोंदवली आहे. आधीच्या आर्थिक वर्षात अल्ट्रा टेक सिमेंटची एकूण विक्री ४०,९०४ कोटी रुपये इतकी होती.

कंपनीचा कर, व्याजापूर्वीचा नफा २७ टक्क्यांनी वाढून ९,९३० कोटी रुपयांवर पोचला आहे. आधीच्या आर्थिक वर्षात कंपनीने ७,८११ कोटी रुपयांचा नफा कर, व्याजापूर्वी मिळवला होता. 

याशिवाय कंपनीने १३ रुपये प्रति शेअरचा लाभांशदेखील जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत १३० टक्के लाभांशाचा म्हणजेच १३ रुपये प्रति इक्विटी शेअर लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. लाभांशापोटी कंपनीने ३७५.२१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वित्तीय कायदा, २०२० अंतर्गत लाभांशावरील कर लाभांशधारकांवर लागू केला जातो. 

मार्चअखेर सरलेल्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अल्ट्रा टेक सिमेंटची १०,५७९ कोटी रुपयांची एकूण विक्री केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने १२,१७० कोटी रुपयांची विक्री केली होती. चौथ्या तिमाहीत कंपनीने २,६३९ कोटी रुपयांचा कर, व्याजापूर्वीचा नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला २,६७२ कोटी रुपयांचा कर, व्याजापूर्वीचा नफा मिळाला होता. तर चौथ्या तिमाहीत कंपनीने ३,२४३ कोटी रुपयांचा करपश्चात नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने १,०६४ कोटी रुपयांच्या करपश्चात नफ्याची नोंद केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com