
कोविड-१९ महामारीमुळे सूर असलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील आणि जगातील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात भारतातील कार्बन उत्सर्जनात २६ टक्क्यांची घट झाली आहे. तर जागतिक कार्बन उत्सजर्नात एप्रिल महिन्यात १७ टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल २०१९च्या तुलनेत ही घट नोंदवण्यात आली आहे.
जगातील कार्बन उत्सर्जनात झाली १७ टक्क्यांची घट
* कार्बन उत्सर्जनात दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घट
* २०२०च्या अखेरपर्यत ही घट ४.४ टक्के ते ८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज
* इंग्लंडमध्ये ३०.७ टक्के, चीनमध्ये २३.९ टक्के आणि अमेरिकेत ३१.६ टक्के घट
कोविड-१९ महामारीमुळे सूर असलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील आणि जगातील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात भारतातील कार्बन उत्सर्जनात २६ टक्क्यांची घट झाली आहे. तर जागतिक कार्बन उत्सजर्नात एप्रिल महिन्यात १७ टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल २०१९च्या तुलनेत ही घट नोंदवण्यात आली आहे. एका अभ्यास अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंग्लंडस्थित नॅशनल क्लायमेट चेंज या जर्नलने एक आंतरराष्ट्रीय अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या अभ्यासानुसार जानेवारी ते एप्रिल २०२० या कालावधीत जगातील कार्बन उत्सर्जनात २०१९च्या तुलनेत मोठी घट झाली आहे. २०२०च्या अखेरपर्यत ही घट ४.४ टक्के ते ८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. या अभ्यास अहवालानुसार २०२० मध्ये होणारी एका वर्षातील कार्बन उत्सर्जनातील घट ही दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतची सर्वात मोठी घट आहे. भारताप्रमाणेच इतर अनेक देशांमधील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली आहे. यात इंग्लंड, चीन आणि अमेरिकेचाही समावेश आहे.
रिलायन्सचा राईट्स इश्यू झाला खुला
इंग्लंडमधील कार्बन उत्सर्जनात ३०.७ टक्के आणि अमेरिकेतील कार्बन उत्सर्जनात ३१.६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. तर चीनमधील कार्बन उत्सजर्नात २३.९ टक्के घट झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात कार्बन उत्सर्जनात ७ एप्रिलला प्रतिदिन १७ टक्क्यांची म्हणजेच १.७ कोटी टन कार्बन डाय ऑक्साईडची घट नोंदवण्यात आली आहे. अशी पातळी याआधी २००६ मध्ये नोंदवण्यात आली होती. कार्बन उत्सर्जनात होणाऱ्या घटीत जवळपास निम्मी घट रस्ते वाहतूकीमुळे झाली आहे. तर वीज निर्मिती घटल्यामुळे १९ टक्के, उद्योग थंडावल्यामुळे २५ टक्के आणि हवाई वाहतूक थंडावल्यामुळे १० टक्के घट कार्बन उत्सर्जनात झाली आहे.
म्युच्युअल फंड एसआयपी : छोटा पॅकेट, बडा धमाका
अर्थात जागतिक हवामान बदलावर यावर्षीच्या कार्बन उत्सजर्नातील घटीचा फारसा परिणाम होणार नाही. कारण आतापर्यत पृथ्वीवर झालेले कार्बन उत्सर्जनासमोर हे प्रमाण खूपच कमी आहे. जागतिक हवामान बदलाला आटोक्यात आणण्यासाठी यापेक्षा कितीतरी अधिक कार्बन उत्सर्जन घटण्याची आवश्यकता आहे, असेही या अभ्यास अहवालात म्हटले आहे.