esakal | हॉर्नच्या कर्कश आवाजापासून मिळेल आराम, सरकारचा नवीन नियम
sakal

बोलून बातमी शोधा

हॉर्नच्या कर्कश आवाजापासून मिळेल आराम, सरकारचा नवीन नियम

लवकरच तुम्हाला वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजापासून सुटका मिळेल असे नितीन गडकरी म्हणाले.

हॉर्नच्या कर्कश आवाजापासून मिळेल आराम, सरकारचा नवीन नियम

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

Car Horns: मोदी सरकार त्रासदायक ठरणाऱ्या वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाबाबत नवीन नियम लागू करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी याची माहिती दिली. वाहनांच्या हॉर्नचा आवाज सुसह्य करण्यासाठी नवीन नियमांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच तुम्हाला वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजापासून सुटका मिळेल असे नितीन गडकरी म्हणाले.

हेही वाचा: दररोज वाचवा 50 रुपये आणि व्हा कोट्यधीश, कसे ? जाणून घ्या...

वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावर नाराजी व्यक्त करत सध्या या हॉर्नचे आवाज बदलण्याचे काम सुरु असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. त्यांच्या मंत्रालयाचे अधिकारी यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे तुम्हाला हॉर्नच्या कर्कश आवाजाऐवजी भारतीय वाद्यांचा (Indian musical instruments) मधुर आवाज ऐकायला मिळेल असेही गडकरी म्हणाले.

हॉर्नच्या आवाजाने प्रचंड त्रास होत असल्याचे नितीन गडकरींनी सांगितलेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात 11 व्या मजल्यावर राहतात, दररोज सकाळी 1 तास प्राणायाम करतात. पण हॉर्नचा आवाज सकाळच्या शांततेला कायम छेद देतो असे गडकरींनी सांगितले. या त्रासानंतरच वाहनांचे हॉर्न चांगले आणि सुसह्य असावेत असा विचार डोकावल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

हेही वाचा: आर्थिक वर्ष 2021-22 पासून तुमची असू शकतात दोन पीएफ खाती

कारच्या हॉर्नचा आवाज हा भारतीय वाद्यांचा असावा आणि त्यादृष्टीने काम सुरु केल्याचे गडकरींनी सांगितले. तबला, ताल, व्हायोलिन, बिगुल, बासरी सारख्या वाद्यांचा आवाज हॉर्नमधून ऐकायला मिळायला हवा असेही ते म्हणाले.

यातील काही नियम वाहन उत्पादकांना लागू असतील. म्हणून, जेव्हा वाहन तयार केले जात असेल, तेव्हा त्याला योग्य प्रकारचे हॉर्न असतील याकडे लक्ष द्यावे लागेल. वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांप्रमाणे वाजवावेत, असा आदेश सरकार देऊ शकते असेही त्यांनी सांगितले. नवीन आदेशानंतर, हॉर्नऐवजी, तबला, ताल, व्हायोलिन, बिगुल, बासरी इत्यादी भारतीय वाद्ये ऐकू येतील ज्याने त्रास कमी होईल यात शंका नाही, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

loading image
go to top