अमेरिकन, सौदी कंपन्यांची नजर रिलायन्स जिओवर

Jio
Jio

* जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये याआधीच तीन कंपन्यांची गुंतवणूक
* फेसबुक, विस्टा इक्विटी पार्टनर आणि सिल्व्हर लेकने केली गुंतवणूक
* ६५ अब्ज डॉलरच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्येमधील भागीदारासाठी जगभरातील अनेक कंपन्या उत्सुक

मुकेश अंबानी यांच्या ६५ अब्ज डॉलरच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्यास आणखी दोन कंपन्यां रांगेत असल्याचे समोर येते आहे. याआधीच जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्यात अनेक कंपन्यांनी रस दाखवला आहे. अलीकडेच तीन गुंतवणूक करारांची घोषणा कंपनीने केली आहे. यात आणखी काही भर पडण्यासंदर्भातील माहिती एका इंग्रजी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अमेरिकन गुंतवणूक कंपनी जनरल अटलांटिक, जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ८५ कोटी डॉलर ते ९५ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. अटलांटिकबरोबरचा जिओचा करार या महिन्यात पूर्णत्वात जाण्याची शक्यता आहे. अर्थात अजून या दोन्ही कंपन्यांमधील करारासंदर्भातील अंतिम बोलणी अजून पूर्ण झालेली नाही आणि त्यात बदल होऊ शकतो. सौदी अरेबियाची कंपनी, पब्लिक इव्हेस्टमेंट फंड (पीआयएफ) सुद्धा जिओमधील काही हिस्सा विकत घेण्यास इच्छुक आहे.

याआधी रिलायन्स इंडस्ट्रीजने विस्टा इक्विटी पार्टनरला जिओमधील १.५ अब्ज डॉलरच्या हिश्याच्या केलेल्या विक्रीची घोषणा केली आहे. मागील दोन आठवड्यातील जिओचा हा तिसरा करार आहे. जिओने २२ एप्रिलला फेसबुकला ९.९९ टक्के हिस्सा ५.७ अब्ज डॉलरला विकण्याची घोषणा एप्रिलमध्ये केली होती. याशिवाय सिल्व्हर लेकने जिओमध्ये ७५ कोटी डॉलरची गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती. या तीन करारांद्वारे रिलायन्स जिओमध्ये एकूणम ८ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज आपले कर्ज शून्यावर आणण्याचा प्रयत्न करते आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजवर असलेले कर्ज शून्यावर आणण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली होती. रिलायन्स जिओची सुरूवात केल्यानंतर कंपनीने देशातील दूरसंचार क्षेत्रात मुसंडी मारली आहे. रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय जिओ प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून कंपनीने डिजिटल व्यासपीठाद्वारे मिडिया, रिटेल या क्षेत्रांमध्येही मोठ्या महत्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. आगामी काळात जिओ प्लॅटफॉर्म्स आणि व्हॉट्सअपच्या संयुक्त भागीदारीतून देशातील रिटेल क्षेत्रात विस्तार करण्याचा रिलायन्सचा प्रयत्न आहे. 

त्यामुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये होणाऱ्या गुंतवणूकीकडे सर्वच जगाचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com