या वाहनातून जिवंत मासे थेट तुमच्यापर्यंत...

vehicle for transporting live fish
vehicle for transporting live fish

लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार तसेच मासे विक्रेत्यांची गरज लक्षात घेऊन जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहन (एलएफसीएस) विकसित केले आहे. यामुळे ताज्या माशांना बाजारपेठेत चांगला दर मिळून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. 

असे आहे वाहतुकीचे वाहन 
मासे वाहतूक करणारे हे वाहन पूर्णपणे डीसी ऊर्जेद्वारे चालते. वाहन चालविण्यासाठी लागणारी ऊर्जा लीड ॲसिडच्या चार बॅटरीच्या माध्यमातून तयार केली जाते. या ऊर्जानिर्मितीतून प्रदूषण होत नाही.
 एकदा बॅटरी चार्जिंग केल्यावर हे वाहन ५०० किलो वजनासह ८० कि.मी. पर्यंत चालते. 
वाहतुकीदरम्यान मासे जिवंत राहाण्यासाठी वाहनामध्ये वायूविजय यंत्रणा, गाळण प्रक्रिया, शीतकरण यंत्रणा आणि अमोनिया वायू बाहेर टाकणारी यंत्रणा आहे. या सुविधमुळे मासे जिवंत राहाण्याचे प्रमाण चांगले आहे. यामध्ये दर ४० किमीला १ टक्क्यांपेक्षाही कमी मासे मरण्याचे प्रमाण आहे.
वाहनाच्या माध्यमातून गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील माशांची वाहतूक शक्य आहे. 
वाहनाची एका वेळेस १०० किलो जिवंत मासे वाहून नेण्याची क्षमता आहे. ही क्षमता वाढवणे शक्य आहे.
वाहनाचा वापर करून लहान मच्छीमार थेट तलावापासून किरकोळ बाजारात ताजे जिवंत मासे विक्रीसाठी नेऊ शकतात. याचबरोबरीने या वाहनाद्वारे मस्यबीज वाहतूक, प्रजननासाठी वापरण्यात येणारे मासे, शोभेचे मासे तसेच संशोधनासाठी जिवंत माशांची वाहतूक करणे शक्य आहे.  मासे विक्रेत्यांना हे वाहन उपयुक्त ठरणारे आहे. 
वाहनाच्या तंत्रज्ञानास सिफेट संस्थेने मान्यता दिलेली आहे. तसेच याचे पेटंट देखील नोंदविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कृषी विकास फंड या संस्थेने देखील या वाहनाच्या प्रसारासाठी मदत केली आहे.  
मत्स्य वाहतूक वाहनाची संपूर्ण यंत्रणेसह किंमत सुमारे दोन लाख आहे. त्यामुळे हे वाहतुकीचे वाहन मच्छिमारांना आर्थिकदृष्यादेखील किफायतशीर आहे.

वाहनाचे फायदे
मत्स्य वाहतूक वाहनामध्ये स्वयंचलित वायुवीजन, गाळण यंत्रणा आहे. तसेच शीतकरण यंत्रणा असल्याने माशांचा ताजेपणा टिकवून ठेवता येतो. माशांची मरतूक अत्यंत कमी होते. 
पारंपरिक प्रणालींच्या तुलनेत यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाणी वापरले जाते. 
पारंपरिक प्रणालीमध्ये माशांच्या वाहतुकीसाठी किमान ४ ते ५ मजूर लागतात. परंतु, या वाहनासाठी एकच मजूर लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर बचत होते. 
ग्राहकांना ताज्या प्रतीच्या माशांचा खात्रीशीर पुरवठा होतो. 
वाहनाच्या वापराने प्रदूषण होत नाही. लहान मच्छिमार तसेच मासे व्यावसायिकांसाठी हे वाहन फायदेशीर आहे. 
हे वाहन महिलादेखील चांगल्याप्रकारे चालवू शकतात. त्यामुळे महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com