सर्वांना एकत्र घेऊनच आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न : सौरभ पटेल  

सर्वांना एकत्र घेऊनच आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न : सौरभ पटेल  

गुजरातच्या उर्जामंत्र्यांशी खास बातचीत

पुणे : गुजरातमध्ये येत्या 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान 9वे व्हायब्रंट गुजरात समिट 2019 संपन्न होते आहे. त्यानिमित्ताने गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात त्यांनी रोड शो देखील केला. सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत त्यांनी व्हायब्रंट गुजरातच्या संदर्भात वेगवेगळ्या मुद्दयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये देशाच्या इतर राज्यांनाही गुंतवणूकदारांसमोर आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील उद्योगपती आणि व्यावसायिकांना व्हायब्रंट गुजरात समिटच्या व्यासपीठावर संधी शोधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यंदाच्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये आफ्रिकेतील देशांसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर छोट्या, लघु आणि मध्यम उद्योगांनाही विशेष प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व्हायब्रंट गुजरातसारख्या कार्यक्रमांमुळे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली असल्याचे त्याचबरोबर राज्याच्या जीडीपीमध्ये आणि रोजगारात भर पडल्याचेही मत पटेल यांनी व्यक्त केले. याचा फायदा गुजरातपुरताच मर्यादीत न राहता देशालाही त्याचा लाभ होत असल्याचे सौरभ पटेल यांनी सांगितले. इतर राज्यांमधील उद्योग गुजरातकडे वळवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगत सर्व राज्यांनी निकोप स्पर्धा करत उद्योग धंद्यांमध्ये वाढ करावी, रोजगार निर्मिती करावी आणि एका नव्या भारताची निर्मिती करावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

पायाभूत सुविधा, विशेषत: उर्जा क्षेत्रात गुजरातने उत्तम प्रगती साधली असून नजीक भविष्यात सौरउर्जा तसेच पवन उर्जेतून मोठी उर्जा निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्हायब्रंट गुजरात समिट आणि पायभूत सुविधांचा विकास यामुळे रोजगार निर्मितीत गुजरात देशात आघाडीवर आहे. देशाच्या जीडीपीमध्ये गुजरातचे भरघोस योगदान आहे. व्हायब्रंट गुजरात समिटच्या निमित्ताने जगभरातीलच नव्हे तर देशातील उद्योगांनासुद्धा नव्या नव्या संधीचा लाभ घेत देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलता येणार आहे. सर्व राज्यांनी एकमेकांना पूरक ठरत निकोप स्पर्धा करावी. त्याचा भारताच्या आर्थिक प्रगतीला लाभच होईल. त्यामुळे देशातील इतर राज्यांनासुद्धा या प्रक्रियेत सामील करून घेण्याची भूमिका असल्याचे मत सौरभ पटेल यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com