विजय मल्ल्यांचा आणखी एक प्रताप!

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

950 कोटींचे कर्ज मिळवतानाही फसवणूक;  दक्षिण आफ्रिकेतील रिसॉर्टची माहिती लपवली

मुंबई: फरारी असलेला यूबी समूहाचा अध्यक्ष विजय मल्ल्या याने 950 कोटींचे कर्ज मिळवण्यासाठी हमी देतानाही फसवणूक केली होती. सादर केलेल्या ताळेबंदात दक्षिण आफ्रिकेतील व्हीजेएम रिसॉर्टविषयी कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही, असे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात उघड झाले आहे. नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात सीबीआयने याचा उल्लेख केला आहे.

सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे, की नियम डावलून कर्ज मंजूर करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेतील एक कोटी अमेरिकी डॉलर (49 कोटी 75 लाख रुपये) किमतीचे व्हीजेएम रिसॉर्ट तसेच देवी मल्ल्या व प्रेमा मल्ल्या यांच्या संपत्तीतील अनुक्रमे 47 कोटी 74 लाख व 47 कोटी 73 लाखांचा मल्ल्याचा हिस्सा, या संपत्तीचा उल्लेख सीबीआयने केला आहे. या कर्जासाठी सादर करण्यात आलेल्या हमीपत्रात मल्ल्याच्या मालमत्तेबाबत कोणतीही ठोस माहिती देण्याचे टाळले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील यूएनबी कंपनीच्या 746 कोटी 25 लाखांच्या समभागांची तपासणीही करण्यात आली नसल्याचे आरोपपत्रात सीबीआयने नमूद केले आहे.

आयडीबीआय बॅंकेने विजय मल्ल्या याने कर्ज बुडवल्याप्रकरणी तक्रार केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, आयडीबीआयने मल्ल्या याच्या मालकीच्या "किंगफिशर'ला कमी व्याजदराने कर्ज दिल्याचे उघड झाले.

सहा महिन्यांत विमानाचे बिल 9.87 कोटी
घेतलेल्या कर्जापैकी 70 कोटी किंगफिशर कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यातील 9 कोटी 87 लाख 67 हजार 420 रुपये एका विमानाचे भाडे देण्यासाठी वापरण्यात आले. 28 मे ते 28 नोव्हेंबर 2009 या काळात वापरण्यात आलेले हे विमान एअरलाइन्सच्या कामकाजासाठी नसून, मल्ल्याच्या खासगी कामांसाठी वापरण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात समजले आहे.

Web Title: vijay mallya one more Drama