विजय मल्ल्याच्या अडचणी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

लंडन - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याने गंडा घातलेल्या तेरा भारतीय बॅंकांना ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिलासा देत एक आदेश जारी केला असून, त्यानुसार मल्ल्या याच्या ब्रिटनस्थित मालमत्तांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने याबाबत कारवाईचा स्पष्ट आदेश दिलेला नसला तरी, या आदेशान्वये उच्च न्यायालयाच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांना मल्ल्याच्या हर्टफोर्डशायर व अन्य ठिकाणच्या मालमत्तांमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आदेशामुळे बॅंकांना आपली थकबाकी वसूल करण्यासाठी एक पर्याय खुला झाल्याचे मानले जात आहे. अंमलबजावणी अधिकारी मल्ल्या याची मालमत्ता ताब्यात घेऊ शकतात.

लंडन - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याने गंडा घातलेल्या तेरा भारतीय बॅंकांना ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिलासा देत एक आदेश जारी केला असून, त्यानुसार मल्ल्या याच्या ब्रिटनस्थित मालमत्तांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने याबाबत कारवाईचा स्पष्ट आदेश दिलेला नसला तरी, या आदेशान्वये उच्च न्यायालयाच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांना मल्ल्याच्या हर्टफोर्डशायर व अन्य ठिकाणच्या मालमत्तांमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आदेशामुळे बॅंकांना आपली थकबाकी वसूल करण्यासाठी एक पर्याय खुला झाल्याचे मानले जात आहे. अंमलबजावणी अधिकारी मल्ल्या याची मालमत्ता ताब्यात घेऊ शकतात. प्रसंगी यासाठी बळाचा वापर करण्याची मुभाही न्यायालयाने त्यांना दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay mallya problem increase