'व्हिस्टा इक्विटी पार्टनर' ची जिओमध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
Friday, 8 May 2020

जिओ प्लॅटफॉर्मने सलग 3आठवड्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून 60हजार596कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे.सॉफ्टवेअर गुंतवणुकीचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे.

मुंबई - 'व्हिस्टा इक्विटी पार्टनर'ने 'जिओ'मध्ये 11 हजार 67 कोटी रुपयांची  गुंतवणूक करणार आहे. जिओमधील  2.32 टक्के भागीदारी 'व्हिस्टा इक्विटी'ला मिळणार आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात 'जिओ'मध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे.

 'जिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणुकीनंतर व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स' ही रिलायन्स आणि फेसबुकनंतर सर्वात मोठा गुंतवणूकदार बनला आहे. जिओ प्लॅटफॉर्मने सलग तीन आठवड्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून (कंपन्यांकडून) 60 हजार 596 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. 

आणखी वाचा - लॉकडाउनचा सर्वांत मोठा फटका पुण्याला

सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी:

'व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स' ही एक अमेरिकी इन्व्हेस्टमेंट फर्म असून जी फक्त तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येच  गुंतवणूक करते. व्हिस्टा ही जगातील 5 वी सर्वात मोठी एंटरप्राइझ सॉफ्टवेअर कंपनी आहे. ज्यांचे एकत्रित  भांडवल सुमारे 57 अब्ज  डॉलर्सपेक्षा अधिक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 कंपनीकडे एंटरप्राइझ 
सॉफ्टवेअर गुंतवणुकीचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे.  व्हिस्टा पोर्टफोलिओमध्ये 
13 हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले,  “ जगातील सर्वात  मोठ्या तंत्रज्ञान गुंतवणूकदारांपैकी एक महत्वाचा भागीदार म्हणून व्हिस्टाचे स्वागत 
करताना मला  आनंद होत आहे. आमच्या इतर भागीदारांप्रमाणेच व्हिस्टाची दूरदृष्टी सामायिक आहे. सर्व भारतीयांच्या हितासाठी भारतीय 'डिजिटल इकोसिस्टीम' विकसित आणि कायापालट करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. 

व्हिस्टाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट 
एफ. स्मिथ म्हणाले,  ‘जिओ भारतासाठी बनवित असलेल्या डिजिटल सोसायटीच्या संभाव्यतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. अंबानींच्या दूरदृष्टीमुळेच डेटा क्रांतीला चालना मिळाली आहे. जिओ प्लॅटफॉर्मवर सामील झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे.”

गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी फेसबुकने जिओमध्ये सुमारे 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक तर सिल्व्हर लेकने 5 हजार 655 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.

कर्जमुक्तीकडे वाटचाल:
अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त करण्याचा ठरविले आहे. सध्या कंपनीवर सुमारे एक लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अंबानींनी रिलायन्समध्ये धोरणात्मक गुंतवणूकदारांना संधी देऊन या वर्षाच्या अखेरपर्यंतच कंपनीला कर्जमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त करण्याचा संकल्प अंबानी यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या शेअरधारकांच्या बैठकीत केला होता. 

रिलायन्स समूहात परदेशी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक

सौदी अरॅमको :53 हजार 125 कोटी रुपये

फेसबुक: 43 हजार 574 कोटी रुपये 

 विस्टा इक्विटी पार्टनर्स: 11 हजार 367 कोटी रुपये

सिल्व्हर लेक: 5 हजार 655 कोटी रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vista Equity Partner invests 11,367 crore in Jio