'व्होडाफोन आयडिया'चे सीईओ बलेश शर्मा यांचा राजीनामा

'व्होडाफोन आयडिया'चे सीईओ बलेश शर्मा यांचा राजीनामा

मुंबई: व्होडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या बलेश शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शर्मा यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे. शर्मा यांना व्होडाफोन समूहातच नवी जबाबदारी दिली जाऊ शकते असेही सूत्रांकडून समोर येते आहे. शर्मा यांच्या जागी रविंदर टक्कर यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. टक्कर सध्या व्होडाफोन आयडिया आणि इंडस टॉवरच्या संचालक मंडळाच्या सदस्यही आहेत. याआधी रविंदर टक्कर व्होडाफोन रोमानियाचे तीन वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी होते. टक्कर व्होडाफोन समूहात 1994 पासून कार्यरत आहेत.

 बलेश शर्मा व्होडाफोनचे आयडियाबरोबर विलीनीकरण झाल्यापासून मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत होते. त्याआधी शर्मा व्होडाफोन इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणात त्यांचा मोठा वाटा होता. मागील तीन तिमाहींपासून व्होडाफोन आयडियाला मोठा तोटा होतो आहे. रिलायन्स जिओने सप्टेबंर 2016 मध्ये बाजारात पाऊल टाकल्यानंतर व्होडाफोन आयडियाच्या महसूलात मोठीच घट झाली आहे.

 मार्च 2017 मध्ये व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणाची घोषणा झाली होती आणि ऑगस्ट 2018 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. तेव्हापासून कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने घटच होते आहे. जूनअखेर व्होडाफोन आयडियाचे 32 कोटी ग्राहक आहेत. जूनअखेर कंपनीने 11,269.9 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. या कालावधीत कंपनीला 4,873.9 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com