व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण अंतिम टप्प्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार सचिव अरूणा सुंदराराजन यांनी दिली.

नवी दिल्ली: व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार सचिव अरूणा सुंदराराजन यांनी दिली. दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण असलेल्या व्होडाफोन आणि आयडियाच्या एकत्रीकरणाला शेअर बाजार नियामक 'सेबी' आणि 'एनसीएलटी'कडून आधीच हिरवा कंदील मिळाला आहे. 

सुंदराराजन या '5 जी'च्या संबंधित सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीओएआय) कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होत्या. दूरसंचार विभाग  व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण जलदगतीने पार पाडण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर कुमार मंगलम बिर्ला हे अकार्यकारी अध्यक्ष आणि बालेश शर्मा हे कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असतील. 

दोन्ही कंपन्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरणार असून जूनपर्यंत एकत्रीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भारत  5 जी तंत्रज्ञानासाठी पूर्णपणे तयार असल्याचेही सुंदराराजन यांनी सांगितले. 

Web Title: Vodafone-Idea merger in final stage of approval