व्होडाफोन-आयडिया उभारणार 50 हजार कोटींचे भांडवल!

व्होडाफोन-आयडिया उभारणार 50 हजार कोटींचे भांडवल!

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन-आयडिया लवकरच 50,000 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारणार आहे. कंपनीच्या समभागधारकांनी यासंदर्भातील परवानगी दिली आहे. यामुळे कंपनीला व्यवसायात अतिरिक्त भांडवल ओतता येणार आहे.

देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण भारतात सध्या रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या तीनच मुख्य स्पर्धक कंपन्या आहेत. व्होडाफोन आयडियाचा हा प्रस्ताव कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 92 टक्के समभागधारकांनी मंजूर केला आहे. हे भांडवल शेअर कॅपिटलच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. कंपनीच्या शेअरच्या बदल्यात हे भांडवल उभारण्यात येते. याआधी कंपनीने 25,000 कोटींचे भांडवल राईट्स इश्यूद्वारे उभारले आहे.

व्होडाफोन-आयडिया इंडस टॉवर कंपनीतील आपला 11.15 टक्के हिस्सा विकून भांडवल उभारणार आहे. या प्रस्तावालाही मंजूरी मिळाली आहे. इंडस टॉवर सध्या भारती इन्फ्राटेलबरोबरच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com