
Vodafone Layoff : पुढील 5 वर्षात Vodafone मध्ये होणार सर्वात मोठी कर्मचारी कपात; वाचा काय आहे कारण
Vodafone Layoff : गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. आता या यादीत Vodafone कंपनीचे नाव देखील जोडले गेले आहे.
आर्थिक मंदीच्या वाढत्या दबावाचा परिणाम व्होडाफोनवर झाला आहे. या कंपनीने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कंपनी पुढील 5 वर्षांसाठी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.
बाजारातील मंदीचा प्रभाव लक्षात घेता, व्होडाफोनने नोव्हेंबर 2022 मध्येच कंपनी खर्चात कपात करण्याची घोषणा केली होती.
2026 पर्यंत कंपनी खर्च 1.08 बिलियन डॉलर पर्यंत कमी करेल. स्पेनमधील टेलिफोनिका आणि फ्रान्समधील ऑरेंज यांसारख्या युरोपीय बाजारपेठेतील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी खर्चात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...
फायनान्शिअल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, व्होडाफोन जगभरातील शेकडो नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. यामध्ये कंपनीच्या लंडन येथील कार्यालयात सर्वात मोठी कपात केली जाणार आहे.
कंपनी जगभरातील सुमारे 1,04,000 लोकांना नोकऱ्या देते. या कपातीचा भारतावर काय परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे.
हेही वाचा: Best Stock : 1 लाखाचे 74 लाख, 'हा' स्मॉलकॅप स्टॉक तुम्हालाही माहिती आहे?
व्होडाफोनशिवाय अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यामध्ये Byju's, Unacademy, Lead, Swiggy, Vedantu अनेक स्टार्टअप कंपन्या आहेत.
2022 मध्येही ट्विटर, अॅमेझॉन, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.