वॉलमार्टच्या ताब्यात फ्लिपकार्ट

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलरला वॉलमार्ट ताब्यात घेणार आहे. उरलेला हिस्सा कंपनीच्या सध्याच्या भागधारकांकडे कायम राहील. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, चीनमधील टेन्सेंट होल्डिंग्ज लिमिटेड, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट एलएलसी, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन यांच्याकडे उरलेला हिस्सा असेल.

न्यूयॉर्क : भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलरला वॉलमार्ट खरेदी करणार आहे. वॉलमार्टची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूक असून, प्रतिस्पर्धी ऍमेझॉनला भारतासारख्या विकसनशील बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलरला वॉलमार्ट ताब्यात घेणार आहे. उरलेला हिस्सा कंपनीच्या सध्याच्या भागधारकांकडे कायम राहील. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, चीनमधील टेन्सेंट होल्डिंग्ज लिमिटेड, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट एलएलसी, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन यांच्याकडे उरलेला हिस्सा असेल. मागील आठवड्यात सूत्रांनी हा व्यवहार 10 ते 12 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा असेल, असे सूतोवाच केले होते.

वॉलमार्टने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2019 मधील उत्पन्नातील 25 ते 30 टक्के वाटा या व्यवहारासाठी देण्यात येईल. दुसऱ्या तिमाहीअखेर हा व्यवहार पूर्णत्वास जाईल. फ्लिपकार्टमधील नव्या उपकंपनीत दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचाही या व्यवहारात समावेश आहे. यातील हिस्सा भविष्यात अतिरिक्त गुंतवणूकदारांना विकून वॉलमार्टचा हिस्सा काही प्रमाणात कमी केला जाईल.

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहार
फ्लिपकार्टमधील हिस्सा : 77 टक्के
वॉलमार्ट मोजणार : 16 अब्ज डॉलर

भारतीय ई-कॉमर्स उद्योग
2018 : 30 अब्ज डॉलर
2026 : 200 अब्ज डॉलर

Web Title: Walmart company buys Indias most valuable start-up company Flipkart