वॉरन बफे घेतात कर्मचाऱ्यांइतकाच पगार

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

न्यूयॉर्क :  जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि बर्कशायर हॅथवे या कंपनीचे मालक वॉरन बफे  नेहमीच चर्चेत असतात. बफे मालक असून देखील ते आपल्या कंपनीत सर्वसामान्य कर्मचाऱ्याइतकाच पगार घेतात. अलिकडच्या काळात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा (सीईओ) पगार मोठा असतो. शिवाय कंपनीचे सीईओ आणि कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार यांच्या गुणोत्तरावर  नेहमी चर्चा होत असते. कारण सीईओ आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप अंतर असते. 

बफे त्यांच्या गुंतवणूकीच्या ज्ञानाइतकेच साधेपणासाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांबद्दलच्या धोरणावरही चर्चा होत असते. त्यातच आता त्यांच्या पगारासंबंधीची माहिती समोर येते आहे. बफेंचा वार्षिक पगार 1,00,000 डॉलर्स असून त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार 53,510 डॉलर्स आहे. बफेंचा पगार कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा फक्त 1.87 पट जास्त आहे.  हे गुणोत्तर काढण्यासाठी बर्कशायर हॅथवेच्या दोन तृतिय़ांश कर्माचाऱ्यांचा पगार लक्षात घेण्यात आला आहे. 

बफेंकडे 88.8 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा बफेंच्या मालकीचा आहे.
 
Web Title: Warren Buffett Barely Makes More Than Average Berkshire Workers

टॅग्स