पोर्टफोलिओ चेक-अप  कॅम्पचे पुन्हा आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 March 2019

गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच, असे नाही. म्हणूनच त्यांच्या बाबतीत "मिस-सेलिंग'च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच, असे नाही. म्हणूनच त्यांच्या बाबतीत "मिस-सेलिंग'च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी "हेल्थ चेक-अप' करून घेतो, त्याच धर्तीवर "वेल्थ चेक-अप' किंवा "पोर्टफोलिओ चेक-अप' करता येईल का, असा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. वाढत्या मागणीमुळे येत्या 16 मार्च रोजी पुण्यात हा उपक्रम पुन्हा आयोजित केला जाणार आहे. 

सामाजिक गरज लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत "सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर' (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी (थोडक्‍यात "मनी डॉक्‍टर') आपल्याला आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच गुंतवणुकीबाबतच्या प्रश्‍नांबद्दल मार्गदर्शन करतील. 

"सकाळ मनी'चा हा उपक्रम 16 मार्च रोजी (शनिवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत "सकाळ'च्या बुधवार पेठ कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होऊन तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी 73508 73508 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ठेवावा. नावनोंदणी केलेल्यांना यात उपक्रमात सहभागी होता येईल. पुण्याबाहेरील नागरिकांसाठी भविष्यात त्यांच्या शहरांतही असाच उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wealth Check How Do Your Finances Stack Up?