एसबीआयने कोणकोणत्या व्यवहारांवरील शुल्कात केले बदल…

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई: भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) गेल्या महिन्यात आपल्या एटीएम सेवांसह इतर विविध व्यवहारांवरील शुल्कात बदल जाहीर केले होते. ग्राहकांना चेक बुक, एटीएम कार्ड देताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. आजपासून(ता. 1) हे बदल लागू होत असून, बँकेने जाहीर केलेले बदल खालीलप्रमाणे-

मुंबई: भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) गेल्या महिन्यात आपल्या एटीएम सेवांसह इतर विविध व्यवहारांवरील शुल्कात बदल जाहीर केले होते. ग्राहकांना चेक बुक, एटीएम कार्ड देताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. आजपासून(ता. 1) हे बदल लागू होत असून, बँकेने जाहीर केलेले बदल खालीलप्रमाणे-

1) "एसबीआय बडी' हे मोबाईल वॉलेट वापरणाऱ्या ग्राहकांना यापुढे वॉलेटच्या साह्याने एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. या प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, सामान्य ग्राहकांना एटीएम व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नसून केवळ मोबाईल वॉलेटवरुन व्यवहार करणाऱ्यांसाठी हे अतिरिक्त शुल्क असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

2) ऑनलाईन व्यवहार: इमिडिएट पेमेंट सर्व्हिस अर्थात 'आयएमपीएस'मार्फत एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करताना ग्राहकांना पाच रुपये अधिक सेवा शुल्क भरावे लागेल. एक लाखांहून अधिक परंतु दोन लाख रुपयांपर्यंती रक्कम ट्रान्सफर करताना सेवा शुल्कासह 15 रुपयांचे शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, दोन लाखांहून अधिक पाच लाखापर्यंतची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी 25 रुपये शुल्क लागणार आहे.

3) धनादेश पुस्तिका(चेक बुक): बेसिक बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना दहा पानी चेक बुक हवे असेल 30 रुपये अधिक सेवा शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे, पंचवीस पानी चेक बुकसाठी 75 आणि सेवा शुल्क तर पन्नास पानी चेक बुकसाठी 150 रुपये अधिक सेवा शुल्क आकारले जाणार आहे.

4) एटीएम शुल्क: बँकेने यापुढे नव्या डेबिट कार्डांसाठी अर्ज करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्याचे ठरविले आहे. केवळ रुपे क्लासिक कार्ड मोफत उपलब्ध होणार आहे.

5) पैसे काढण्याबाबत: बचत खातेधारकांना सुरुवातीचे चार व्यवहार(एटीएमसह) मोफत असतील. त्यापेक्षा अधिक व्यवहारांसाठी बँक शाखेतून पैसे काढताना 50 रुपये अधिक सेवा शुल्क आकारले जाणार आहे. एटीएम व्यवहारांसाठी हे प्रमाण 20 रुपये अधिक सेवा शुल्क असेल.

6) खराब(सॉइल्ड) नोटा बदलणेबाबत: खातेधारकांना जर एकुण 20 नोटा बदलून घ्यायच्या असतील आणि या नोटांचे मूल्य 5,000 रुपयांहून अधिक असेल तर प्रत्येक अतिरिक्त खराब नोटेमागे 2 रुपये आणि सेवा शुल्क भरावे आकारले जाईल.

Web Title: What changes have been done by SBI on the charges?