esakal | शेअर मार्केटमधील 'भक्तीभाव'; जाणून घ्या 'नफ्याचा मोदक'
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर मार्केटमधील 'भक्तीभाव'; जाणून घ्या 'नफ्याचा मोदक'

चांगल्या मुहूर्तावर बाजारपेठेतील दिग्गजांचे आवडीचे स्टॉक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

शेअर मार्केटमधील 'भक्तीभाव'; जाणून घ्या 'नफ्याचा मोदक'

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

उत्साह आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आजपासून संपूर्ण देशात होत आहे. 10 दिवसांचा गणेश चतुर्थी उत्सव आजपासून संपूर्ण भारतात सुरू झाला आहे. कोरोनामुळे, गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंधही लावण्यात आले आहेत. पण यामुळे भक्तांचा उत्साह काही कमी होणार नाही, याच चांगल्या मुहूर्तावर बाजारपेठेतील दिग्गजांचे आवडीचे स्टॉक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

हेही वाचा: झेन टेकचे शेअर्स फक्त 4 दिवसात तब्बल 60 टक्क्यांनी वाढले

www.rajeshsatpute.com यांना फायदेशीर वाटणारा मोदक स्टॉक : LIC HSG

- LIC HSG हा स्टॉक 400 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करा आणि 460 रुपयांचे लक्ष्य ठेवा असे राजेश सातपुते सांगत आहेत.

www.manasjaisawal.com मानस जयस्वाल यांना वाटणारा फायदेशीर मोदक स्टॉक: HDFC AMC

- एचडीएफसी एएमसी 3074 च्या स्टॉपलॉससह खरेदी करा, त्यात 3800 चे लक्ष्य दिसू शकते असे मानस जयस्वाल म्हणाले.

हेही वाचा: पोस्ट देणार गृहकर्ज, LIC हाऊसिंग फायनान्ससोबत केला करार

Rakashgaba.com च्या प्रकाश गाबा यांनी सांगितलेला फायद्याचा मोदक स्टॉक : HDFC बँक

- दीर्घ कालावधीसाठी एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला प्रकाश गाबा यांनी दिला, यात त्यांनी 2000 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.

रचना वैद्य यांनी सांगितलेला फायदेशीर मोदक स्टॉक: SR TRANS FIN

- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचे शेअर्स 1370 रुपयांच्या पातळीवर खरेदी करा. स्टॉपलॉस 1320 रुपयांच्या खाली ठेवा. यात 1470 ते 1520 रुपयांचे लक्ष्य दिसेल असे रचना वैद्य म्हणाल्या.

हेही वाचा: 'दीदी'वर कब्जा मिळवण्याचा चीनचा प्लॅन, गुंतवणूक वाढवणार

एफ अँड ओ ट्रेडर असित बरन पाती यांनी सांगितलेला नफ्याचा मोदक स्टॉक: आयसीआयसीआय बँक (ICICI BANK)

- असित बारन पाती यांनी आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 700 रुपयांचा स्टॉपलॉस आणि 780 चे लक्ष्य ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शुभम अग्रवाल यांचा फायदेशीर मोदक स्टॉक: बाटा इंडिया (BATA India)

- बाटा इंडियाचा स्टॉक गुंतवणूकदारांना दीर्घकालीन चांगला परतावा देईल. 1650 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करा आणि 1900 रुपयांचे लक्ष्य ठेवण्याचा सल्ला शुभम अग्रवाल यांनी दिला आहे.

हेही वाचा: डाॅक्टरकीचा अभ्यासक्रमात लवकरच बदल होण्याची शक्यता; पाहा व्हिडिओ

MOFSL च्या चंदन तापडिया यांचा विश्वासाचा मोदक स्टॉक : IEX

- या शेअरमध्ये येत्या काळात आणखी तेजी येईल. म्हणूनच, IEX शेअर दीर्घ काळासाठी 560 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करत 650 रुपयांचे लक्ष्य ठेवण्याचा सल्ला चंदन तापडिया यांनी दिला आहे.

आशिष चातुरमोहताचा यांनी सांगितलेला फायद्याचा मोदक स्टॉक : NAUKRI

- गेल्या काही दिवसांपासून या शेअरने चांगली तेजी दाखवली आहे. म्हणूनच, 6400 रुपयांच्या स्टॉप लॉससह NAUKRI स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला आशिष यांनी दिला आहे शिवाय या स्टॉकसाठी 7500 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.

loading image
go to top