‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना सात हजार कोटींचा फटका!

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

मुंबई: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राच्या शेअरमध्ये निराशाजनक तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरने 357.60 रुपयांवर तब्बल 43 महिन्यांची नीचांकी पातळी गाठली. सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर तब्बल 17 टक्क्यांनी कोसळला होता. परिणामी, कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 7,000 कोटी रुपयांची मालमत्ता गमावली. ऑक्टोबर 2013 नंतर प्रथमच कंपनीच्या शेअरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे.

टेक महिंद्राला मार्च तिमाहीत 588 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात सुमारे 33 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. मार्जिन्समध्ये घसरण आणि खर्चात वाढ झाल्याने कंपनीचा नफा घसरला आहे. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 12 टक्क्यांवर पोचले आहे. या काळात नेटवर्किंग बिझनेस कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे कंपनीला दोन कोटी डॉलरचा फटका बसला. याशिवाय, कंपनीने विविध करांपोटी एकुण 232 कोटी रुपयांचा खर्च केला. यात एकुण 28 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय, कंपनीच्या सेवा खर्चात 14.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, कंपनीच्या एकुण महसूलात सुमारे 9 टक्क्यांची वाढ झाली आहे.

(आणखी वाचा: टेक महिंद्राला रु.588 कोटींचा नफा; उत्पन्नात वाढ)

सध्या(सोमवार, 10 वाजून 45 मिनिटे) कंपनीचा शेअर 378.00 रुपयांवर व्यवहार करत असून 51.35 रुपये अर्थात 11.96 टक्क्यांनी घसरला आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरने वर्षभरात 357.60 रुपयांवर वर्षभराची नीचांकी तर 563.75 रुपयांवर उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 36,848.32 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Why Tech Mahindra shareholders lost Rs 7,000 crore