जीएसटी रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढवणार का? कारण... 

जीएसटी रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढवणार का? कारण... 

मुंबई: वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीचे वार्षिक रिटर्न फाइल करण्याची मुदत येत्या 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र मुदत वाढवून देखील आता अखेरच्या काही दिवसांमध्ये जीएसटीचे पोर्टल सतत 'हँग' होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आता अखेरचे आठ दिवस राहिल्याने व्यावसायिकांनी  रिटर्न भरण्यासाठी घाई सुरु केली आहे. त्यात आता तांत्रिक समस्या उभ्या राहिल्याने जीएसटी रिटर्न वेळेत भरले जाणार नसल्याची भीती त्यांना सतावते आहे. जीएसटीच्या नियमित भरणासोबतच वार्षिक रिटर्न फाइल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे.

आता जीएसटी पोर्टलला तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने व्यावसायिकांनी रिटर्न भरण्यासाठी पुन्हा मुदत वाढ देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आता पुन्हा रिटर्न भरण्याची मुदत वाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे. अजूनही निम्म्याहून अधिक व्यावसायिकांनी जीएसटी रिटर्न भरलेले नाही. 

तांत्रिक कारणामुळे जीएसटी रिटर्न भरण्याची इच्छा असून देखील तो भरला जास्त नसल्याने व्यवसायिंकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. शिवाय विलंब शुल्काचा भुर्दंडही सोसावा लागत असल्याने  मनस्तापात भर पडत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com