उद्योजकतेसाठी महिलांना बळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी सरकारने महिला उद्योजकांची व्याख्या केली आहे. तसेच महिला उद्योजकांसाठीच्या विशेष धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात येणारी अनुदाने व त्याचे वितरण यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. यानुसार २५ लाख रुपयांपासून ते दहा कोटी रुपयांपर्यत भांडवल घेऊन महिला उद्योजकांना व्यवसाय करणे सोपे झाले आहे.

या अंतर्गत उद्योग विभागाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. विशेष प्रोत्साहन योजना राबवण्यासाठी तालुक्‍यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार अनुदानात वाढ केली आहे. यात अ व ब, क तालुक्‍यांसाठी कमाल २० लाख अनुदान, ड वर्गातल्या तालुक्‍यांसाठी २५ लाख, उद्योग नसलेले तसेच नक्षलवादी प्रभावित विभागात एक कोटी रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वीजदर, व्याजदर यातही सवलत आहे.

महिला उद्योजकाची व्याख्या 
कंपनीमध्ये १०० टक्‍के भागभांडवल महिला उद्योजकांचे असेल अशी कंपनी धारण करणाऱ्या महिलेला महिला उद्योजक म्हणून संबोधले जाणार आहे. तसेच प्रकल्पात अथवा प्रकल्पाच्या विस्तारीकरणात अथवा मूळ व्यवसाय अथवा त्याचा विस्तार यामध्ये किमान ५० टक्‍के इतक्‍या संख्येने महिला कर्मचारी असेल तर त्या व्यवसायाच्या प्रवर्तक महिला उद्योजक म्हणून ओळखल्या जाणार आहेत. 

Web Title: Women's strengths for entrepreneurship