esakal | Quant Small Cap fund : दीड वर्षांत 360 टक्के परतावा; आता गुंतवणूक करणे योग्य ठरेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

शेअर बाजाराच्या तेजी दरम्यान, क्वांट स्मॉल कॅप फंडाने (Quant Small Cap fund) त्याच्या गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली आहे.

क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये आता गुंतवणूक करणे योग्य ठरेल का?

sakal_logo
By
शरयू काकडे

- शिल्पा गुजर

18 महिन्यांत क्वांट फंडाची (Quant Small Cap fund) एनएव्ही 29.63 रुपयांवरून 135.97 रुपये झाली. शेअर बाजाराच्या तेजी दरम्यान, क्वांट स्मॉल कॅप फंडाने (Quant Small Cap fund) त्याच्या गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली आहे. गेल्या 18 महिन्यांत क्वांटने आपल्या गुंतवणूकदारांना 360 टक्के इतका भरभक्कम परतावा दिला आहे. स्मॉल कॅप फंडमध्ये या कालावधीत हा सर्वाधिक परतावा आहे.

हेही वाचा: महागाईचा भस्मासुर! मुंबईत डिझेल शंभरीपार, पेट्रोलचाही भडका

मॉर्निंग स्टार आणि व्हॅल्यू रिसर्चकडून क्वांट स्मॉल कॅप फंडाला 4-स्टार रेटिंग आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडाची एनएव्ही 23 मार्च 2020 रोजी 29.63 रुपये होती, जी आता 135.97 रुपये झाली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी 23 मार्चमध्ये क्वांट स्मॉल कॅप फंडात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये वाढून 4 लाख 58 हजार 893 रुपये झाले असते.

गुंतवणूक करावी का?
या कॅटेगरीतील इतर फंडांच्या तुलनेत क्वांटची कामगिरी सरस असल्याची माहिती गुंतवणूक सल्लागारांनी दिली. स्मॉल कॅप फंडांमध्ये जोखीम जास्त असते. त्यामुळे जोखीम घ्यायची तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांनी अशा फंड्सपासून दूर राहावे असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा: मॉबिक्विक आणणार आयपीओ; १,९०० कोटी रुपयांच्या आयपीओला सेबीची मंजुरी

गुंतवणुकीचे धोरण काय असावे?गुंतवणूकदार किमान 10-12 वर्षांचे लक्ष्य ठेवून गुंतवणूक करण्यास तयार असतात तेव्हा साधारणपणे स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही अलीकडील परतावा पाहून फक्त स्मॉल कॅप योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते टाळावे असे जाणकार सांगतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top