WPI Inflation : देशात घाऊक महागाईने गाठली12 वर्षांची विक्रमी पातळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPI Inflation : देशात घाऊक महागाईने गाठली12 वर्षांची विक्रमी पातळी!

WPI Inflation : देशात घाऊक महागाईने गाठली12 वर्षांची विक्रमी पातळी!

November WPI Inflation Data: देशांमध्ये महागाई वाढत आहे. नोव्हेंबरमधील घाऊक महागाईचा (Wholesale Price Index – WPI)) दर 12.4 टक्क्यांहून वाढून 14.2' टक्क्यांवर आला आहे. घाऊक महागाईचा हा आकडा १२ वर्षांमध्ये विक्रमी पातळीवर पोहचला आहे. इंधन आणि वीजेच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे घाऊक महागाईमध्ये वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील महागाईचा दर 11.90 टक्क्यांहून वाढून 12.20 टक्यांवर पोहचला आहे आणि सप्टेंबरच्या महागाईचा दराच्या आकड्यांचा अभ्यास केला असता ते 10.66 टक्क्यांहून वाढून 11.80 टक्के झाली होती.

दर महिन्याची आणि नोव्हेबरची घाऊक महागाईची आकडेवारी पाहता, खाण्या-पिण्याच्या पदार्थांची महागाई ऑक्टोबर महिन्यांमध्ये 3.06 टक्क्यांहून वाढून 6.70 टक्क्यांवर आली आहे. तेच मॅन्यूफॅक्चरिंग प्रोडक्ट्समध्ये घाऊक महागाईचा दर 12.04 टक्क्यांनी कमी होऊन 11.92 टक्के झाला आहे.

हेही वाचा: बांधकाम क्षेत्रातील 'हा' स्टॉक देईल मजबूत परतावा!

इंधन आणि वीज दरात वाढ

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ''इंधन आणि वीज हे महागाई वाढण्यास सर्वात मोठे कारण ठरले आहेत, कारण नोव्हेंबर 2020 पासून त्यांच्या किमती जवळपास 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.''

ते म्हणाले की, ''वस्तूंच्या किमती आणि इंधनाच्या किमती देखील वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप उच्च दर आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, ''कमी आधारभूत प्रभाव असूनही, प्राथमिक वस्तू आणि उत्पादन उत्पादनांमधील महागाई दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचली नाही.

हेही वाचा: मंगळवारीही बाजारात घसरण, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

किरकोळ महागाई देखील वाढली

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ)ने किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) द्वारे मोजलेली भारताची किरकोळ चलनवाढ नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के नोंदवली गेली, जी ऑक्टोबरमध्ये 4.48% होती. तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती 6.93 टक्के होती. नोव्हेंबरमधील किरकोळ महागाईचे आकडे वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे फळे आणि भाज्यांच्या किमतीत झालेली वाढ. CPI आधारित महागाई सप्टेंबर 2021 मध्ये 4.35 टक्के आणि ऑक्टोबर 2021 मध्ये 4.48 टक्के होती.

कधी कमी होईल महगाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या निवेदनात महागाई दर वाढू शकतो असे म्हटले होते. कारण आधारभूत वर्षाच्या प्रभावामुळे आकडेवारीत वाढ होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत चलनवाढीचा दर विक्रमी पातळीवर असेल. त्यानंतर ते कमी होईल.

Web Title: Wpi Inflation Hits 12 Year Record High Know The Reason

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :inflation
go to top