
बलार्ड इस्टेट येथील ‘ईडी’च्या कार्यालयात आज दुपारी राणा कपूर यांना नेण्यात आले.
मुंबई : येस बॅंकचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात त्यांची शनिवारी चौकशी करण्यात आली. दरम्यान, येस बँकेच्या या अवस्थेला भाजपचं जबाबदार असल्याची टीका पुन्हा पी. चिदंबरम यांनी केलीय.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
निवासस्थानी छापा
येस बॅंकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने रिझर्व्ह बॅंकेने तिच्यावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. ‘ईडी’ने काल रात्री त्यांच्या वरळी येथील ‘समुद्र महल’ या निवासस्थानी शोधमोहीम राबवली. कर्जवाटपासंदर्भात कागदोपत्री पुरावे प्राप्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या वेळीही त्यांची चौकशी केली होती. ही चौकशी पुढे सुरू ठेवण्यासाठी बलार्ड इस्टेट येथील ‘ईडी’च्या कार्यालयात आज दुपारी राणा यांना नेण्यात आले. बॅंकेने अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी "ईडी'ने मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा - येस बँकेमुळं फोन पे ऍपची बँक बदलली जाणार?
कपूर यांच्यावरील गुन्हा हा ‘डीएचएफएल’ला येस बँकेने दिलेल्या कर्जासंबंधात आहे. काही उद्योगांना दिलेल्या कर्ज प्रकरणात आणि त्या कर्जाच्या परताव्यासंबंधात कपूर यांची काय भूमिका होती याचा तपासही ‘ईडी’ करीत आहे. ही रक्कम कपूर यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे.
येस बँकेचा जो बट्ट्याबोळ झाला आहे त्याला पूर्णपणे भाजपचे वित्तीय संस्थांमधील गैरव्यवस्थापन जबाबदार आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणाची चौकशी करून याला जबाबदार कोण आहे, ते शोधून काढावे.
- पी. चिदंबरम, माजी अर्थमंत्री
येस बँके संदर्भातील घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा
काय घडले?