येस बँकेचा शेअर का 30 टक्क्यांनी घसरला? (व्हिडिओ)

मंगळवार, 30 एप्रिल 2019

खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेचा शेअर आज 30 टक्क्यांनी कोसळला आहे.

मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेचा शेअर आज 30 टक्क्यांनी कोसळला आहे. बँकेने जाहीर केलेल्या चौथ्या तिमाहीतील निकालानंतर बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सकाळी शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात होताच बँकेचा शेअर 213.50 वरून घसरत 166.60 रुपयांवर जाऊन  पोचला होता. 

येस बॅंकेला सरलेल्या चौथ्या तिमाहीत 1,506.64 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत बॅंकेला 1,179.44 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. विश्लेषकांनी सरलेल्या तिमाहीत बॅंकेला 1,050 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज वर्तवला होता. यानंतर सर्वच ब्रोकिंग संस्थांनी बँकेचे रेटिंग घसरवले आहेत. बँकेच्या इतिहासातील एका तिमाहीतील बँकेला हा सर्वात मोठा तोटा झाला आहे. 

याशिवाय, इंडसइंड बँक (6.5%), इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (6%), रिलायन्स होम फायनान्स (18%) यांसारख्या कंपन्यांमध्ये आलेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात येस बँकेचा शेअर 69.55 रुपयांच्या म्हणजेच 29.30 टक्क्यांच्या घसरणीसह 167.85 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 39 हजार 430.55 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: YES Bank share price loses 30 pct