Share Market | 'हा'दमदार शेअर वाढवेल तुमच्या पोर्टफोलिओची शान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

तुम्हीही शेअर बाजारात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता.

Share Market : 'हा'दमदार शेअर वाढवेल तुमच्या पोर्टफोलिओची शान!

शेअर बाजार तज्ज्ञ गुंतवणूकदारांना शेअर बाजारात (Share Market) खरेदीसाठी कायमच सल्ला देत असतात. तुम्हीही शेअर बाजारात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी कॅश मार्केटमधून (Cash Market) एक मजबूत स्टॉक निवडला आहे. इथे शॉर्ट ते लाँग टर्मसाठी पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. संदीप जैन यांनी क्राफ्ट्समन ऑटोमेशनची (Craftsman Automation) निवड केली आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजाराचं सुसाट; सेन्सेक्स 740 तर निफ्टी 172 अंकांनी वधारला

क्राफ्ट्समन ऑटोमेशनच का ?

रशिया आणि युक्रेनमध्ये सामंजस्य निर्माण झाल्यास कच्च्या आणि धातूच्या साठ्यात घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञ संदीप जैन यांनी दिली आहे. अशा स्थितीत ऑटो सेक्टरवर लक्ष वाढू शकते. क्राफ्ट्समन ऑटोमेशन (Craftsman Automation) ही कंपनी मध्यम आणि अवजड वाहनांसाठी काम करते.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन (Craftsman Automation)

- सीएमपी (CMP) - 2311 रुपये

- टारगेट (Target) - 2530 रुपये

हेही वाचा: Share Market: आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड, या 10 शेअर्सवर करा फोकस

कंपनीचे फंडामेंटल्स ?

कंपनीच्या मूलभूत गोष्टींबद्दल बोलायचे झाल्यास, ही कंपनी गेल्या 5-6 तिमाहीपासून चांगली कामगिरी करत आहे. त्याच वेळी, कर्ज कमी करण्यासाठी, कंपनीने आयपीओ आणला होता. FII-DII चीही कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली भागीदारी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: You Can Make A Good Profit By Investing Money For Short To Long Term At Craftsman Automation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..