रिटायर झालात तर मग चिंता कसली? NPS Scheme असल्यावर निवांत राह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National-Pension-System

निवृत्तीनंतर, बहुतेक लोकांना त्यांच्या खर्चाची चिंता असते. हीच चिंता एनपीएस दूर करते.

रिटायर झालात तर मग चिंता कसली? NPS Scheme असल्यावर निवांत राहा

निवृत्तीनंतर, बहुतेक लोकांना त्यांच्या मासिक खर्चाची चिंता असते. त्यामुळेच नोकरी असताना आपल्या भविष्यासाठी तजवीज करणे गरजेचे आहे. यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिम अर्थात एनपीएस हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

- NPS मध्ये गुंतवणुकीचे फायदे

तुम्ही 40 टक्के वार्षिकी (annuity) घेतली आणि वार्षिक दर 6 टक्के असेल, तर निवृत्तीनंतर तुम्हाला 1.56 कोटी रुपये मिळतील. त्यानंतर 1.04 कोटी वार्षिकीमध्ये जातील. आता या ॲन्युइटी रकमेतून तुम्हाला दरमहा 51,848 रुपये पेन्शन मिळेल. ॲन्युइटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी तुमची पेन्शन जास्त असेल.

हेही वाचा: अटल पेंशन योजनेला सर्वाधिक पसंती

वयाच्या 21 व्या वर्षी गुंतवणूक करणे का गरजेचे ?

गुंतवणूकदाराचे वय 21 वर्षे असेल आणि त्याने मासिक 4,500 रुपये गुंतवले तर तो 21 ते 60 वर्ष वयापर्यंत 39 वर्षे गुंतवणूक करेल. म्हणजेच, तो वार्षिक 54000 रुपये गुंतवेल आणि 39 वर्षांत, 21.06 लाख रुपये या योजनेत गुंतवले जातील. जर 10 टक्के परतावा असेल तर मॅच्युरिटीवर 2.59 कोटी रुपये होतील. म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा अंदाजे 51,848 रुपये पेन्शन मिळेल.

तुम्ही NPS ऑनलाइन उघडू शकता.

- eNPS उघडण्यासाठी Enps.nsdl.com/eNPS किंवा Nps.karvy.com या लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा: पेंशन धारकांना आता नो चिंता; लाईफ सर्टिफिकेट वर्षभरात द्या केव्हाही

- न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि तुमची माहिती आणि मोबाईल नंबर भरा. तुमचा मोबाइल नंबर ओटीपीद्वारे व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर बँक खात्याची माहिती भरा.

- तुमचा पोर्टफोलिओ आणि फंड निवडा.

- त्यानंतर नामनिर्देशित व्यक्तीचे नाव भरा.

-ज्या खात्यासाठी तुम्ही तपशील भरला आहे त्याचा कॅन्सल चेक तुम्हाला द्यावा लागेल. कॅन्सल केलेला चेक, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

- तुम्हाला तुमची गुंतवणूक NPS मध्ये करावी लागेल.

- पेमेंट केल्यानंतर, तुमचा परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर तयार केला जाईल आणि तुम्हाला पेमेंटची पावतीही मिळेल.

- गुंतवणूक केल्यानंतर, ई-साइन/प्रिंट नोंदणी फॉर्म पेजवर जा. यात तुम्ही पॅन आणि नेटबँकिंगमध्ये रजिस्टर करू शकता. इथे तुमचे केवायसी होईल (Know your customer). नोंदणी करताना, हे लक्षात ठेवा की ते तुम्ही बँक खात्यात दिलेल्या माहिती आणि इथे दिलेली माहिती सारखी असली पाहिजे. सध्या 22 बँका एनपीएस ऑनलाइनची सुविधा देत आहेत. त्यांची माहिती NSDL च्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.

नोंद - कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top