esakal | अटल पेंशन योजनेला सर्वाधिक पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अटल पेंशन योजनेला सर्वाधिक पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन (National Pension) प्रणालीअंतर्गत (एनपीएस) (NPS) अटल पेंशन (Atal Pension) योजनेला (एपीवाय) (APY) सोशल सिक्युरिटी स्कीमच्या रूपात सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे समोर आले. एपीवायच्या लाभार्थ्यांच्या संख्या २.८ कोटी इतकी झाली आहे. यातील एक मोठा हिस्सा नॉन-मेट्रो (Mom Metro) सेंटरचा आहे.

एनपीएस अंतर्गत ४.२ कोटी लाभार्थापैकी २०२०-२१ च्या अखेरपर्यंत ६६ टक्क्यांहून अधिक म्हणजे २.८ कोटी लाभार्थ्यांनी एपीवायचा पर्याय निवडला होता. एपीवाय सर्वात पुढे एनपीएसच्या वार्षिकी अहवालात ही माहिती समोर आली. राज्य सरकारांची योजना ११ टक्क्यांच्या हिस्सेदारीसह दुसऱ्या स्थानावर राहिली; तर केंद्रीय स्वायत्त संस्थेचा एनपीएस लाभार्थ्यांमधील हिस्सा सर्वात कमी म्हणजे एक टक्का राहिला. राज्य स्वायत्त संस्थांचा हिस्सा यात दोन टक्के राहिला. एनपीएसअंतर्गत एकूण असेट अंडर मॅनेजमेंट वार्षिक आधारावर ३८ टक्के वाढून वर्षाच्या अखेरीस ५.७८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या अखेरीस एनपीएसचे लाभार्थी ४.२ कोटी होते.

हेही वाचा: 'जुन्या पेन्शन योजने'साठी कर्मचारी एकवटले, राष्ट्रीय निषेध दिन पाळून करणार निर्दशने

लाभार्थ्याच्या संख्येतील वाढीसंदर्भातही अटल पेंशन योजना सर्वात पुढे आहे. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात एपीवाय लाभार्थ्यांची संख्या वार्षिक आधारावर ३३ टक्क्यांनी वाढली. त्यानंतर ऑल सिटिजन मॉडल (३२ टक्के) दुसऱ्या स्थानी राहिले

loading image
go to top