मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (शुक्रवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6.25 टक्क्यांवरून कमी होत 6 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत असल्याने त्याचा फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो.
आता कर्जदर कमी झाल्याने गृह आणि वाहन कर्जावर किती फायदा मिळू शकतो ते पाहूया.
(जुना व्याजाचा दर 9.70 टक्के गृहीत धरून रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर जेंव्हा बँका नवीन व्याजदराची अंमलबजावणी करतील तेंव्हा कर्जधारकांना 9.45 टक्के दरानुसार त्याचा फायदा मिळेल. )
गृह कर्ज रक्कम सध्याचा मासिक हप्ता (ईएमआय) नवीन ईएमआय मासिक बचत
(रुपयांमध्ये)
20 लाख 17,674 17,356 318
30 लाख 26,511 26,035 476
50 लाख 44,665 43,867 798
वाहन कर्ज रक्कम सध्याचा ईएमआय नवीन ईएमआय मासिक बचत
3 लाख 6,630 6,293 27
5 लाख 10,550 10,489 61
10 लाख 21,100 20,977 123
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.