esakal | जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मिळणार मोठी जबाबदारी; काय ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Harsh Vardhan To Take Charge As WHO Executive Board Chairman

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मिळणार मोठी जबाबदारी; काय ते वाचा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतासाठी एक महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होत आहे. त्यातच डॉ. हर्षवर्धन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आले आहे. डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

कार्यकारी मंडळांचं काम काय?
हे पूर्णवेळ कामकाज नाही. परंतु डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहण्याची आवश्यकता असेल, असं सांगण्यात आले आहे. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. तसंच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर तसंच धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.
---------
लाईव्ह गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल; दोघांचा मृत्यू
---------
अमेरिकेपेक्षा भारताची स्थिती चांगली
--------
भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारतीची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहानं सर्वांच्या संमतीनं घेतला होता. २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमधअये या कार्यकाळी मंडळाचं पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येतं. तसंच २२ मे पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

loading image
go to top