Zomato News : Zomato ने घेतला मोठा निर्णय; ग्राहकांवर होणार परिणाम, कंपनीने देशातील 225 शहरांमधून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zomato

Zomato News : Zomato ने घेतला मोठा निर्णय; ग्राहकांवर होणार परिणाम, कंपनीने देशातील 225 शहरांमधून...

Zomato Exits Smaller Cities : देशातील ऑनलाइन फूड डिलिवरीत काम करणाऱ्या Zomato या कंपनीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात झोमॅटोने जवळपास 225 छोट्या शहरांमधील व्यवसाय बंद केला आहे. कंपनीच्या डिसेंबर-तिमाहीच्या कमाईच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

कंपनीने भागधारकांना लिहिले पत्र :

Zomato चे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षांत गोयल यांनी कंपनीच्या भागधारकांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात आम्ही जवळपास 225 लहान शहरांमधून बाहेर पडलो आहोत.

कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही (Q3FY23) शी संबंधित अहवाल जारी केला आहे. ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूच्या (GOV) 0.3 टक्के योगदान दिले आहे. गोयल यांनी भागधारकांना सांगितले की, हे एक आव्हानात्मक वातावरण आहे.

परंतु आम्ही अलीकडच्या आठवड्यात मागणीत सुधारणा पाहत आहोत, ज्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, सर्वात वाईट काळ संपला आहे.

1,000 हून अधिक शहरांमध्ये व्यवसाय :

Zomato च्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी 2021-22 मध्ये, कंपनी देशातील 1,000 हून अधिक शहरांमध्ये फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी व्यवसाय चालवत होती.

गोयल म्हणाले की, गेल्या काही तिमाहीत या (225) शहरांच्या खराब कामगिरीमुळे आम्हाला हे करावे लागले. या शहरांमधून बाहेर पडल्याने कंपनीच्या खर्चावर काही परिणाम होईल का. यासंदर्भात गोयल म्हणाले की, फारसा परिणाम होणार नाही.

कंपनीचा तोटा 5 पटीने वाढला :

गुरुग्रामस्थित झोमॅटो कंपनीचे म्हणणे आहे की, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत तिचा महसूल 75 टक्क्यांनी वाढून 1,948 कोटी रुपये झाला आहे. यात कंपनीचा तोटा 5 पटीने वाढून 346 कोटी रुपये झाला आहे.

31 डिसेंबर रोजी संपलेल्या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीच्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी Zomato ने सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत रु. 1,581 कोटी आणि डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत रु. 1,200 कोटींच्या तुलनेत रु. 1,565 कोटींचा समायोजित महसूल कमावला आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

झोमॅटोचा शेअर घसरला :

Zomato च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळी बीएसईवर कंपनीचा शेअर 1.47 टक्क्यांनी घसरून 53.60 रुपयांवर आला. NSE वर तो 1.38 टक्क्यांनी घसरून 53.65 रुपयांवर आला आहे.

दरम्यान, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 118.15 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 60,688.07 वर व्यवहार करत होता.

टॅग्स :IndiaBusinesszomatocity