जागतिक महिला दिन

अनीश सुतार
गुरुवार, 8 मार्च 2018

'ती' अवकाशात झेपावली...कलाक्षेत्रात चमकली.. 'ति'नं राजकारण गाजवलं...अर्थकारण घडवलं...खरं तर समाजाने निर्माण केलेल्या 'ति'च्याभोवतीच्या बंधनांना झुगारून देऊन तिच्या स्वप्नांचं आभाळ आवाक्यात आणलं. मुक्तीची चाहूल 'ति'ला खरं तर आधीपासूनच खुणावत होती. पण मुक्तीचे हे डोहाळे कितीही आर्त जरी असले तरी ते पुरवायला तिच्यापाशी कुणीच नव्हते. मग 'ती' कधी 'सावित्री' झाली तर कधी 'रमाबाई', कधी 'सरोजिनी' तर कधी 'इंदिरा', कधी 'कल्पना' तर कधी 'सुनीता. समाजाच्या विरोधाला ती नेहमीच हासत हासत सामोरे गेली आणि 'स्वयंसिद्धा' झाली.

'ती' अवकाशात झेपावली...कलाक्षेत्रात चमकली.. 'ति'नं राजकारण गाजवलं...अर्थकारण घडवलं...खरं तर समाजाने निर्माण केलेल्या 'ति'च्याभोवतीच्या बंधनांना झुगारून देऊन तिच्या स्वप्नांचं आभाळ आवाक्यात आणलं. मुक्तीची चाहूल 'ति'ला खरं तर आधीपासूनच खुणावत होती. पण मुक्तीचे हे डोहाळे कितीही आर्त जरी असले तरी ते पुरवायला तिच्यापाशी कुणीच नव्हते. मग 'ती' कधी 'सावित्री' झाली तर कधी 'रमाबाई', कधी 'सरोजिनी' तर कधी 'इंदिरा', कधी 'कल्पना' तर कधी 'सुनीता. समाजाच्या विरोधाला ती नेहमीच हासत हासत सामोरे गेली आणि 'स्वयंसिद्धा' झाली. मैलोन्मैल पिछाडीवर असणारी 'ती' आज मात्र सरसकट सगळ्याच क्षेत्रात 'त्या'ला मागे टाकतेय..आणि तरीही 'ति'ची पूर्वापार सुरू असलेली लढाई मात्र आजही चालूच आहे तीही तितक्याच (किंबहुना अधिकच) जोरकसपणे..
                    
जन्माला येण्यापूर्वीच आईच्या गर्भशयात असल्यापासूनच 'ति'ची लढाई चालू होते. पुढे (जन्म मिळालाच तर) बंधनाचे ओझे वागवत 'ती' मोठी होते. मग लग्नाचे बंधन, आणि त्यानंतर  संसाराच्या रणांगणावर विविध भूमिकेत लढणारी ती रणरागिणी आयुष्यभर लढत राहते...न थकता..अविरतपणे. आज 'ति'ची लढाई फक्त घरापुरतीच मर्यादित नाहीय. 'ती' आज कमावती झालीय. उच्च पदांवर पोहोचलीय. पण अमानवी चेहऱ्याच्या सापळ्यात 'ती' आजही हतबलच आहे. बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांच्या जोरावर 'ति'ने  स्वतःची वाट तर निर्माण केली पण त्या वाटेचा वाटेकरी 'त्या'नही व्हावं ही 'ति'ची सुप्त इच्छा अजूनही अपुरीच आहे...
                   
२१व्या शतकातही पूर्वापार चालत आलेली पुरुषसत्ताक मानसिकता  टिकून राहावी ही खर तर आपल्या सर्वांसाठीच खेदाची बाब आहे. ही मानसिकता  वैश्विक झाली असून मानवी स्वभावाचा भाग झालीय.ती बदलण्यासाठी आपण सर्वांनी 'ति'ला हातभार लावले पाहिजेत. आपण 'ति'च्याकडे नेहमीच आई, बहीण, बायको, मुलगी, मैत्रीण, प्रेयसी अशा विविध नजरेतून  पाहतो पण फक्त 'माणूस' म्हणून तिच्याकडे कधीच का पहात नाही? आजच्या या दिवशी सर्वजण तिच्याकडे 'माणूसपणा'च्या 'निखळ' आणि 'निगर्वी' भावनेतून पाहण्याचा संकल्प करूया आणि आपल्या सर्वांना या सुंदर जगात आणणाऱ्या त्या 'स्त्रीशक्ती'समोर नतमस्तक होऊया. जागतिक महिलादिनाच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा..

गहिरे पाणीवरिल आणखी ब्लॉग्ज वाचण्यासाठी क्लिक करा - http://osathire.blogspot.in/2017/04/blog-post_29.html

इतर ब्लॉग्स