न्यु मॉम्ससाठी उपयोगी अॅप्स...

motherly
motherly

प्रत्येक नव्या फेजमध्ये जाताना मनात आनंद, भीती, हुरहुर अशा अनेक भावना एकावेळेला येतात. शब्दात कदाचीत ते मांडता येणार नाही पण, अगदी शाळेच्या पहिल्या दिवशी, कॉलेच्या पहिल्या दिवशी, पहिल्यांदा आपण प्रेमात पडलोय हे समजतं त्या दिवशी, लग्नात आपण माळ घेऊन अंतरपाटाच्या एका बाजूला उभे असतो तेव्हा या सगळ्या वेळेला आपण सगळ्यांनी ही फुलपाखरं अनुभवलेली असतात. पण पालक होणं हा यातला सगळ्यात सुंदर आणि खूप मोठी जबाबदारी अंगावर टाकणारा अनुभव आहे असं मला वाटतं. अगदी पहिल्या दिवसापासून, काय होईल? ते सगळं कसं होईल? असे अनेक प्रश्न सगळ्याच आई होणाऱ्या मुलींना पडलेले असातात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणचे आता इतके दिवस जे उनाडक्या करत फिरत होतो ते बंद होणार की काय असं वाटत असतं. यासाठी खरंच मनाची तयारी करावी लागते. पण या सगळ्यात मला माझी डॉक्टर (मुग्धा जोशी) आणि माझ्या अनुभवी मैत्रिणी यांनी मदत तर केलीच पण ''काही नाही होत गं..'' या एका वाक्यानी मला बराच धीर मिळायचा..  शिवाय एका नवीन आई होणाऱ्या मुलीला जेवढ्या सूचना मिळतात तेवढ्या कुणालाही मिळत नाहीत हे पण समजले....

आणखी एक वाक्य मला या पहिल्या वर्षीच्या प्रवासात नेहमी ऐकायला मिळालं, ''आजकाल किती सोयी झाल्या आहेत गं, आमच्या वेळेला हे काही नव्हतं''. तुमच्या पैकी बऱ्याच जणिंनी हे ऐकलं असेल. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, बाळाला सांभाळण्यासाठी किंवा त्याची काळजी घेण्यासाठी अनेक नवीन गोष्टी आपल्या मदतीला आहेत. पण या गोष्टींची माहिती आपल्या अनुभवी मैत्रिणींकडून जास्त योग्य मिळते. त्यामुळे माझा हा सगळा अनुभव म्हणजे माझी ही ब्लॉग डायरी आहे....ज्यांना पॅरेंटींगमध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्यांसाठी इंटरेस्टींग ठरु शकेल असं मला वाटलं....

प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांमध्ये, अगदी रोजच्या जेवणापसून ते फिरसाण्यासाठी वेळ काढण्यापर्यंत वेळेचं प्लॅनिंग करायचे आहे हे लक्षात येतं तेव्हा खरी कसरत सुरु होणार आहे याची जाणीव होते. डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स, रोज घेण्याच्या गोळ्या अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. या सगळ्यामध्ये काय खायचं, वाचायचं, ऐकायचं याचं मार्गदर्शन आपल्याला घरातून मिळतंच पण याच्या जोडीला काही अॅप्स आपल्या मदतीला आहेत. यामधली सगळी अॅप्स मी वापरलेली नसली तरी यापैकी काही अॅप्स खुपच मस्त आहेत.

मी खाली दिलेल्या यादीतील सगळी अॅप्स अँड्रॉईड आणि आयओएसवर चालतात.
1 पिंक पॅड (Pink Pad) - हे अॅप तुम्ही प्लॅनिंग करुन चान्स घेणार असाल तर त्यासाठी उपयुक्त आहे. कारण यावर पीरियड्स, ओवल्युशन आणि फर्टाइल डेजचं ट्रॅकिंग करता येतं.
2 बेबी सेंटर (Baby Center) - प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यापासून तुमच्या बाळाची वाढ कशी होते आहे. कोणत्या महिन्यात त्याची वाढ कशी असणार आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे अशा अनेक गोष्टींची माहिती या अॅपवर आहे. शिवाय यात एक बर्थ ग्रुप आहे. उदाहरणार्थ श्रीयची जुलै महिन्यातली आहे. त्या महिन्यात जन्माला आलेल्या बाळांच्या आईचा हा ग्रुप आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या अनेकजणी इथे तुम्हाला भेटतील. एकमेकिंशी तुम्हाला बोलता येतं. काही अडचण असेल तर शेअर करता येते. शिवाय इथे असलेल्या सगळ्याजणी एकाच फेजमध्ये असल्याने थोड्याफार फरकाने प्रत्येकीचे प्रॉब्लेम्स सारखेच असतात. त्यामुळे एकमेकींना मदत करता येते.
3 कॉन्ट्रॅक्शन टायमर (Contraction Timer) - अतिशय साधं आणि सोपं अॅप आहे. ज्यामुळे दोन कॉन्ट्रॅक्शन मधला वेळ मोजता येतो. आणि त्यानुसार हॉस्पिटलमध्ये कधी जायचं हे ठरवता येतं. (टिप - म्हणजे त्यावेळेला अॅप वगैरे बघाण्या इतकी परिस्थिती नसते. पण तुमच्या नवऱ्याला याचा उपयोग होऊ शकतो. कारण आपल्या पेक्षा जास्त ते भंजाळलेले असतात. ;-) त्यामुळे माहिती असलेली बरी )
4 बेबी ट्रॅकर (Baby Tracker) - बाळ झाल्यानंतरचे काही आठवडे सगळ्यात अवघड असतात. कारण यावेळी सगळ्या गोष्टी एकत्र येत असतात. त्यामुळे या वेळात बाळाच्या छोट्या छोट्या गेष्टींची नोंद ठेवणे अवघड जाते. परंतु, डॉक्टरांच्या माहितीसाठी ही नोंद ठेवणे गरजेचं असते. उदा. बाळाला दिवसातुन किती वेळेला आणि किती वेळ फिडिंग केलं किंवा बाळ किती वेळ झोपतयं, किती वेळा उठतयं असे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा एका क्लिकवर हा ट्रॅक राहु शकतो. त्यामुळे हे मस्तच आहे...
5 द वंडर विक्स (The Wonder Weeks) - बाळाचे प्रत्येक महिन्यानुसार माइलस्टोन्स आणि त्याप्रमाणे तुमचं बाळ येग्य ती प्रगती करत आहे ना.. या सगळ्याची माहिती, त्याबद्दलचे प्रश्न आणि त्याची उत्तर असं सगळं या अॅपवर आहे.
6 ईम्युनाईज इंडिया (Immunize India) - बाळाला प्रत्येक महिन्याला वेगवेगळी व्हॅक्सिनेशन्स द्यावी लागतात. त्याच्या रिमाइंडरसाठी हे अॅप आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com