आपल्या देशाची ओळख कोणासारखी करायची ?

danger social media
danger social media

सोशल मीडियावरील गैरसमाजमुळे गुन्ह्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. गेल्या आठवड्याभरात साधारणतः महाराष्ट्रात एकूण सात ते आठ ठिकाणी अशा स्वरुपाचे गुन्हे झाले आहेत. त्यातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील पाच जणांवर झालेला हल्ला भयंकर होता. त्या हल्ल्यात पाच जणांचे हकनाक बळी गेले. या हल्यासाठी सोशल मीडियाला कारणीभूत ठरवंले गेलं. खरं पाहिलं तर या हत्यापाठीमागे जेवढ्या प्रमाणात सोशल मीडिया कारणीभूत आहे, तेवढ्याच प्रमाणात आपण विसरत चाललेलो सामाजिक भान आणि आपले अज्ञान तेवढेच कारणीभूत ठरत आहे. एका सोशल मीडियावरील अफवेने या पाच जणांचा बळी गेला...

धुळ्यातील राईनपाड्याची घटना घडत असताना सर्वांनी हे प्रकरण नेमके काय आहे? हे समजून घेऊन त्यात हस्तक्षेप करुन शांततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु, तेथील उपस्थित त्या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात जास्त धन्यता मानत होते. कदाचित, त्यावेळी उपस्थितांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले असते तर, त्या पाच निष्पाप लोकांचा जीव नक्कीच वाचला असता.

आता... दुसरी घटना मुंबईतील. विमान कोसळल्याची. विमान कोसळल्यानंतर तिथे ज्याप्रकारे बघ्यांनी गर्दी केली होती, त्या गर्दीमुळे तेथे अग्निशामन दलाला आणि पोलिसांना व्यवस्थित मदतकार्य करता येत नव्हते. यामुळे पूर्ण गोंधळ उडाला होता. म्हणजे आपण आपले सामाजिक भान सोडून काहीतरी विचित्र करण्याच्या पाठीमागे धावत असतो. मुंबई घटनेदरम्यानही जमेल ती मदत करण्यापेक्षा किंवा पोलिस आणि अग्निशामक दलाला अडथळा न बनण्यापेक्षा तिथे उभे राहून फोटो काढण्यात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात नेटिझन्स धन्यता मानत होते. सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी लोक ज्या प्रकारे धडपड करत होते ती धडपड खरोखरच कीव येण्यासारखीच होती.

दोन्ही घटनाचा संदर्भ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण सोशल मीडियाचे बळी तर आहोतच पण त्याचबरोबर आपण प्रसिद्धीसाठी मरतोय. परंतु एक समाज म्हणून, माणूस म्हणून आपण हरवत चाललोय का? याचा विचार करायला हवा. एखादा जमाव कायदा हातात घेतो अन् पाच-पाच जणांचे बळी घेतो. हे किती भयानक आहे. हे देशहिताच्या आणि समाजहिताच्या बाबतीत किती भयंकर आहे हे समजून घ्यायला हवे. आपल्यातला अडाणीपणा दूर ढकलायला हवा. संवेदनशील विषयांना ओळखून त्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला हवा. कुठल्या गोष्टीला प्रसिद्धी द्यायला हवी आणि कुठल्या नाही याची समज आपल्याला असायला हवी. आपला समाज आपणच विद्वेषच्या वणव्यात ढकलतोय, हे लक्षात घ्यायला हवे.

आपण कोठे जन्माला येतो हे सुद्धा अनेकवेळा महत्वाचे असते, त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी सीरिया, पाकिस्तानसारखी दहशतवादाची ओळख असलेल्या भारतात जन्माला यायचे की, सुसंस्कृत भारतात जन्माला यायचे हे आता आपल्यालाच ठरवायला हवे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी उजाड देशात जन्माला यावे असे आपल्याला नक्कीच वाटणार नाही आणि आपण जर असेच वागत राहिलो तर, भविष्यात अधोगतीकडे गेलेला समाज आपल्याला दोषी धरेल. आपण काही कारणावरून आपल्या पूर्वजांना ज्याप्रमाणे दोष देत असतो अगदी त्याचपद्धतीने आपल्या भावी पिढ्या आपल्याला दोष देत राहतील एवढे मात्र नक्की !

अशा स्वरुपाच्या एकाच आठवड्यात महाराष्ट्रात 7-8 घटना घडल्या. सोशल मीडिया हा विषय जेंव्हा येतो तेव्हा पोलिस, कायदा सुव्यवस्था, राज्य सरकारला दोष देणे या गोष्टीवर आपण आपले लक्ष केंद्रित करून आपल्या आतली आग शमवत असतो. परंतु, अशावेळी माणूस म्हणून आपलं डोकं, आपली सद्सद्विवेकबुद्धी जागेवर आहे की नाही हे तपासणं गरजेचे आहे. आणखी असे किती बळी गेल्यावर आपण आपले अडाणी धंदे बंद करुन आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करायला शिकणार आहोत हाही प्रश्नच आहे.

हे सर्व नाकारणे आपल्या हातात आहे. आपण परिस्थिती समजून घेणे जास्त आवश्यक आहे. मुळात आपण एका रेषेवर उभे आहोत. दुसऱ्या महायुद्धात 1945 साली अमेरिकेच्या हल्यात बेचीराख झालेले नागासकी आणि हिरोशिमा आज कुठे आहेत आणि आपल्याचसोबत स्वतंत्र झालेला पाकिस्तान कुठे आहे, हे पाहून आपण आपल्या देशाची ओळख पाकिस्तानसारखी करायची की, जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी सारखी समृद्ध करायची हे ठरवणे जास्त गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com