व्हॉट टू ईट व्हेन प्रेग्नंट ?

motherly_part_3.
motherly_part_3.

एकदा गुड न्युज आहे असं कळालं की सगळ्यांच्या काय खायचं, काय नाही हे सल्ले ऐकायला तयार राहायलाच हवं. यात सगळ्यात जास्त सूचना कोणाच्या असतील तर त्या आईच्या असतात. हे खा, ते खाऊ नको.. मग अमुक एक पदार्थ नक्की खायचा की नाही खायचा...कळेनासं होतं. नवीन आई होणाऱ्या सगळ्यांना याबाबत अनेक प्रश्न असतात..शिवाय ज्या मुली नोकरी करतात त्या हल्ली अगदी डिलिव्हरीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत काम करतात. त्यामुळे काम सांभाळून खाण्याचे रुटीन सांभाळताना बरीच ओढाताण करावी लागते. 

याबाबत अनेक गोष्टींची माहिती घरातल्या मोठ्या अनुभवी सगळ्याजणी तुम्हाला दोतीलच..पण या ब्लॉगमुळे थोडंसं टेन्शन कमी होईल असं वाटलं.. कारण प्रेग्नन्सी म्हटली की डाएट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो..

फर्स्ट ट्रायमेस्टमध्ये बऱ्याच जणींना मळमळ, नॉशा सारखे त्रास होतात. त्यामुळे साधं आणि घरचे अन्ने खायला हवं. शक्यतोवर बाहेरचं खाणं मी टाळलं होतं. याशिवाय पपईसारखी काही फळं माझ्या डॉक्टरने पण मला खाऊ नको असं सांगितल्याने तेवढी फक्त टाळली. बाकी घरचे, ताजे असे सगळे पदार्थ मी खात होते. ''पण दोन जणांसाठी नाही'' हे एवढ्यासाठी कारण एकदा तुम्ही प्रेग्नंट आहात म्हटल्यावर खाण्याचा भडिमार होतो. नशिबाने माझ्यावर तो झाला नाही... त्यामुळे मला जेवढं जाईल तेवढंच मी खात होते. 

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं दूध..शतावरी घातलेलं दूध मी अगदी रोज नाही तरी बऱ्याचदा घेत होते. पण तुम्हाला आवडत असेल आणि त्याचा त्रास होत नसेल तर हे मात्र भरपूर घ्या..शतावरीचाही चांगला फायदा होतो.  

याशिवाय दोनचार गोष्टी मी माझ्या रुटीनमध्ये ठरवून घेतल्या होत्या तेवढ्या मात्र रोज खात होते. त्यामध्ये पंचामृत, नारळाचे पाणी आणि सिझनल फळं हे ठरलेलं होतं. रोज एक सफरचंद डॉक्टर खायला सांगतात. पण मला ते खायला फारसं आवडत नव्हतं.. त्यामुळे सिझनमध्ये मिळणारी इतर फळं मी भरपूर खाल्ली... त्यामुळे असं काही पर्टिक्युलर डाएट वगैरे केलंच पोहिजे असे मुळीच नाही.

एकूणच मला असं वाटतं की जेवढं जाईल तेव्हडं आणि जे वाटतं ते मॉडरेशमध्ये खायला काहिच हरकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com