बेबी स्किन केअर...

वृंदा चांदोरकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बाळ लहान असते तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्किन केअर. बाळाची स्किन एवढी नाजूक असते की नेमके कोणते प्रॉडक्ट वापरावे आणि कोणते नाही याबाबत चांगलाच गोंधळ होतो. त्यामुळे ही माहिती कदाचित नवी आई होणाऱ्या सगळ्यां जणींना उपयोगी ठरेल. 

बाळ लहान असते तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्किन केअर. बाळाची स्किन एवढी नाजूक असते की नेमके कोणते प्रॉडक्ट वापरावे आणि कोणते नाही याबाबत चांगलाच गोंधळ होतो. त्यामुळे ही माहिती कदाचित नवी आई होणाऱ्या सगळ्यां जणींना उपयोगी ठरेल. 

बाळाचे स्किन केअर रुटीन ठरवताना तिन गोष्टी असतात. मसाज, बेदिंग आणि मॉइस्चराइजिंग या तिन गोष्टी योग्य झाल्या तर फारसा बाळाच्या स्किनला त्रास होत नाही. पण माझ्या बाळासाठी मला डॉक्टरांनी दिलेल्या प्रॉडक्टशिवाय काही वापरता येत नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असणारे ब्रॅंड मला फारसे माहित नाही. पण कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करताना साधारण काय काळजी घ्यावी याबाबतही मी थोडी माहिती घेतली होती. तुमच्या बाळाची स्किन पण सेन्सेटिव्ह असेल तर खाली दिलेले प्रॉडक्ट्स् आणि माहिती उपयोगी ठरु शकतील.

मसाज - मी बऱ्याचदा हिमालया कंपनीचे प्रॉडक्ट वापरते. त्यातले हिमालया बेबी मसाज ऑईल मी वापरत होते. पावसाळा किंवा हिवाळा यामध्ये हे ऑईल मला चांगले वाटले. कारण यामध्ये ऑलिव्ह ऑईलचा बेस आहे. हवामान बददलं की थोडाफार आपण वापरत असलेल्या प्रॉडक्टमध्येही बदल करावा लागतो ही नवीन गोष्ट मला शिकायला मिळाली. उन्हाळ्यात डॉक्टरांनी खोबऱ्याचे तेल लावायला सांगितले होते. त्यासाठी मी केरळी दुकानात मिळणारे Edible Coconut Oil वापरत होते. थोडे स्टिकी असले तरी इतर कसली त्यात भेसळ नसते. त्यात मिनरल ऑईल पण नसते. त्यामुळे हेच तेल मी वापरले. काही जण बदाम तेलही वापरतात. त्यामुळे तुमच्या बाळाच्या स्किनला चालत असेल तर हमदर्दचे बदाम तेलही छान आहे. बेबी प्रॉडक्ट खरेदी करताना ते नॅचरल आहेत ना..? पॅराबिन फ्री आहे ना..? त्यात अॅनिमल फॅट्स नाहीत ना ? हे सगळं मी बघतेच.. पण काही प्रॉडक्ट जे डॉक्टरांनी रेकमेंड केले आहेत त्यात हा चॉईस फारसा ठेवता येत नाही. 

बेदिंग - लहान बाळाच्या अंगावरची लव कमी व्हावी यासाठी आपल्याकडे बाळाला डाळीचं पीठ लावायची पद्धत आहे. पण माझ्या बाळाला डाळीचं पीठ, हळद, चंदन पावडर हे काहीच चालत नव्हतं. त्यामुळे यातलं काहीच लावता आलं नाही. मला पण हा प्रश्न होता की मग बाळाची पहिली लव जी निघून जायला पाहिजे ती जाणार का? मला जॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे ही नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे मी 'डॅफी सोप' वापरायला सुरुवात केली. मला त्याचे रिझल्ट खूपच चांगले मिळाले. तसचं हिमालयाचा शॅम्पु... याव्यतिरिक्त फार प्रॉडक्ट मी वापरत नाही. 

मॉइस्चराइजिंग - यासाठी मी सुरुवातीला हिमालयाचेच मॉइस्चराइजर वापरत होते. सगळ्या प्रॉडक्टमध्ये मला हिमालयाचे प्रॉडक्ट जास्त चांगले वाटतात. पण माझ्या Mosquito Bite Allergy आहे. (असे काही असतं हे मला  अशी अॅलर्जी झाल्यानंतरच कळालं -  त्यामुळे मी म्हटलं तसं आपल्याला अनेक गोष्टी नव्यानी शिकाव्या लागतात) त्यामुळे त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यासाठी मला वेगळं लोशन दिलं. त्यासाठी मी कॅलोरा हे लोशन वापरते.

याशिवाय बाळासाठी पावडर वापरताना मी दोन प्रकारच्या वापरते. एक म्हणजे किटो आणि हिमालया प्रिकली हीट बेबी पावडर. 

याव्यतिरिक्त मला डॉक्टरांनी दिलेली एक टीप - कोणतही नवीन प्रॉडक्ट बाळासाठी वापरताना पॅच टेस्ट करावी आणि त्यानंतरच ते प्रॉडक्ट बाळासाठी वापरावे. 

हे प्रॉडक्ट खरेदी करताना त्याच्या लेबलवर कोणत्या गोष्टी बघायच्या याचीही छोटीशी लिस्ट देत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतिल किंवा काही सुचवायचे असेल तर नक्की कळवा.  

याव्यतिरिक्त प्रॉडक्ट लेबलवर या गोष्टी नक्की चेक करा
- Paraben free
- SLS free - Sodium lauryl (ether) sulfate
- Mineral oil free
- Polyethylene glycol free

Please note that I am not a medical professional and this information does not replace any medical advice that you can get directly from your doctor, always consult your doctor for the most specific advice. My intention for making these blogs is to provide awareness and support to new moms.

इतर ब्लॉग्स